प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी काही वेळ मृतदेहाजवळ बसून होता. मग मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची याचा विचार करत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने मृतदेह शेजाऱ्याच्या अंगणात ठेवण्याचा कट रचला.
त्याने मृताच्या घरातून विवस्त्र मृतदेह ओढत नेला. मात्र, यावेळी स्थानिकांनी त्याला पाहिले. यानंतर लोकांनी आरडाओरडा केल्यावर आरोपी तेथून पळून गेला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कोरबा : प्रेमात पडल्यावर प्रियकराचा प्रेयसीवर आणि प्रेयसीचा प्रियकरावर विश्वास असतो. मात्र, अनेकदा काही जण या विश्वासाचा गैरफायदा घेतात. अशाच एका विवाहित प्रेयसीच्या विश्वासघात करत तिची हत्या करण्यात आली आहे.
छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्ह्यातील पसान पोलीस स्टेशन परिसरात खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. दमदहापारा रामपूर गावात एका 19 वर्षीय तरुणाने 35 वर्षीय प्रेयसीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह शेजारच्या अंगणात लपवायचा होता.
मात्र, गावकऱ्यांच्या नजरेस पडताच तो मृतदेह सोडून घटनास्थळावरून पळून गेला. घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेचा पती काही कामानिमित्त दुसऱ्या गावी गेला होता. याचा फायदा घेत मृत महिलेने तिच्या 19 वर्षीय प्रियकर समारूला घरी बोलावले.
मृत महिलेला तीन मुलं होती, त्यांना तिने एका खोलीत झोपवले आणि बाहेरून कुलूप लावले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही रात्रभर दारू आणि चिकन पार्टी करत मस्ती करत होते. पहाटे तीन वाजता प्रियकर तरुणाला घरी जायचे होते. मात्र, विवाहित प्रेयसी त्याला जाऊ देत नव्हती.
पाच वाजेपर्यंत ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर समारूने घरात ठेवलेल्या फावड्याने तिची हत्या केली. यानंतर त्याने शेजाऱ्याच्या घरातच त्याच्या प्रेयसीचा नग्न अवस्थेतील मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, गावकऱ्यांनी त्याला, असे करताना पाहिले असता हा प्रकार समोर आला. यानंतर याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मृताच्या पतीने आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पळस पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवकुमार धारी यांनी सांगितले की, आरोपी समारू गोड याचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो रात्री 11 वाजता त्याच्या प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. रात्री झालेल्या वादातून रागाच्या भरात त्याने प्रेयसीची हत्या केली.