क्राईमताज्या बातम्या

चाकूचा धाक दाखवून बलात्कार तिला दारू पाजली आणि स्वतः दारू पिऊन दुष्कर्म


राजनांदगांव : ओळखीचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याच्या घटना घडल्याचे तुम्ही वाचले असेल. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत तिघांनी दुष्कर्म केले.
पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी नुकतेच डोंगरगड रोडवर पीडितेला दारू पाजून तिच्यासोबत दुष्कर्म केले.

आरोपींपैकी एक हा पीडितेचा पूर्वीचा ओळखीचा होता. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडितेला घरी सोडण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर एका निर्जन ठिकाणी नेले आणि आपल्या दोन इतर मित्रांसह बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही घटना 10 सप्टेंबरला रात्री 9 वाजेपासून ते 1 वाजेच्या दरम्यान घडली.

पीडित मुलीचे वय 15 आहे. ती यावेळी राजनंदगाव शहरातूनच आपल्या कामानंतर घरी परतत होती. पीडितेला घरी जाताना एका तरुणाने तिच्यासोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेत तिला बाईकवर बसवले. काही अंतर गेल्यावर त्याने मोटारसायकलवर आपल्या आणखी एका साथीदाराला मुलीच्या मागे बसवले.

त्यानंतर पीडितेला निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे त्याने तिसऱ्या साथीदाराला बोलावून पीडितेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, यावेळी आरोपींनी तिला दारू पाजली आणि स्वतः दारू पिऊन दुष्कर्म केले. यासंदर्भात बसंतपूर पोलिस स्टेशनचे सीआर चंद्रा यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यात आले आहे.

पूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तीने मुलीला गाडीवर बसवले आणि त्याच्या दोन साथीदारांसह एका निर्जन ठिकाणी बलात्काराची केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला शहरातील एका भागात सोडले आणि घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *