ताज्या बातम्या

ईनामी जमीनच्या विक्री साठी बेकायदेशीर नाहरकत प्रमानपत्र चौकशीची मागनी


ईनामी जमीनच्या विक्री साठी बेकायदेशीर नाहरकत प्रमानपत्र दिल्याचा तहसिलदार वाबळे यांच्यावर आरोपचौकशी करून निलंबीत करन्याची दिपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी

परंडा : परंडा तालूक्यातील खासगाव येथिल ईनामी जमीन गट नंबर ५१ व ५४ मधील ८० आर जमीन खरेदी विक्री साठी तत्कालीन प्रभारी तहसिलदार वाबळे यांनी बेकायदेशीर ना हरकत प्रमाण दिल्याचा आरोप करन्यात आला असुन वाबळे यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करन्यात आली आहे .

दि १७ मार्च रोजी दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

खासगाव येथिल ईमामी जमीन गट नंबर ५१ व ५४ मधील ८० आर जमीने ची खरेदी विक्री करन्या साठी नायब तहसिलदार वाबळे यांच्या कडे परभार असताना तहसिलदार पदाचा दुरुपयोग करून शासनास नजराना रक्कम भरून न घेता दि २० ऑगष्ट २०२१ना हरकत प्रमाणपत्र दिले .

तसेच ईनामी जमीन वर्ग २ असताना वर्ग १ मध्ये रूपांतरीत केली आहे असा आरोप करन्यात आला आहे .

सध्या परंडा येथे नायब तहसिलदार पदावर कार्यरत असलेले सुजित वाबळे यांची खाते निहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करन्यात आली आहे .

निवेदनावर उमेश सोनवणे , असद
दहेलूज, साजिद मुजावर ,स्वप्नील कांबळे , अरविंद सोनवणे , मिलींद बनसोडे , रोहन बनसोडे , सागर बनसोडे , सुजल बनसोडे , पिंटू गोठे , यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

[] खासगाव येथिल ईनामी जमीन खरेदी विक्री साठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र शासनाच्या नियमा नुसार असुन कोणतेही चुकीचे काम केलेले नाही असे नायब तहसिलदार वाबळे यांनी असे सांगीतले ,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *