केसीसी आता किसान क्रेडिट कार्डधारक व्यक्तींना 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. जर शेतकरी बांधवांनी 1 लाख कर्ज घेतले तर त्यासाठी त्यांना काहीच कारण द्यावे लागणार नाही.
केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड ही योजना राबवली होती. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना वेळेवर कर्जाची सोय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी यामुळे सहजरीत्या भांडवल उपलब्ध होईल असे देखील सांगितले जात आहे. शेतकरी बांधवांना आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत एक लाख रुपयापर्यंत कर्ज घेण्यासाठी काहीच तारण ठेवावे लागतं नाही. मात्र 1 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज हवे असल्यास गॅरंटी द्यावी लागणार आहे.