दिव्यांग व्यक्तींना उपोषणाला बसण्याची दुर्दैवी वेळ आणू देऊ नका- ऍड प्रकाश मुंडे
बीड : परळी वैजनाथ संजय गांधी निराधार व ग्राम निधी योजने अंतर्गत बोगस लाभार्थी कमी करून जे पात्र आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा खरा लाभ मिळावा तसेच, परळी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील दिव्यांगांचा 5 टक्के राखीव निधी मिळावा या मागण्या घेऊन कण्हेरवाडी येथील काही दिव्यांग व्यक्ती लहूदास रोडे, नगुराव बहिरे, यशवंत रोडे,सुधाकर फड हे परळी तहसील समोर उपोषणाला बसले होते, यावेळी बीड जिल्हा काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस ऍड प्रकाश मुंडे यांनी तात्काळ या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या संदर्भात तहसीलदार यांच्याशी चर्चा केली तसेच भविष्यात तालुक्यातील कुठल्याच दिव्यांग व्यक्तींना अशी उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी मागणी देखील केली काँग्रेस पक्ष सदैव समाजातील वंचित, शोषित घटकांच्या पाठीशी कायम उभा आहे असे यावेळी काँग्रेसचे बीड जिल्हा सरचिटणीस ऍड प्रकाश मुंडे यांनी उपोषणकर्त्यांना बोलताना भावना व्यक्त केल्या.