होळीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणीय होळी विषयक कार्यक्रम लिंबागणेश जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला असून दुर्गुणांची होळी करूया, होळी लहान करू, पोळी दान करू तसेच रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करत आरोग्याची हानी टाळावी याविषयी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मार्गदर्शन केले.
पर्यावरणीय होळी या विषयी बोलताना होळीचा सण साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी होळीसाठी वापरले जाणारे लाकुड, गोव-या आदि इंधन सर्वाच्या जीवनोपयोगी वस्तुचा भाग झाला असून त्याचा जपुनच वापर करायला हवा. याचवेळी होळीला दिला जाणारा पुरणपोळीचा नैवेद्य हा पुर्णपणे होळीत न टाकता एखादा घास टाकुन गरजुंना देण्यात यावा. एकंदरीतच लहान होळी साजरी करून, पोळी गरजुंना दान करत नैसर्गिक रंगाचा वापर करून धुलिवंदन साजरे करण्यात यावे जेणे करून रासायनिक रंगाचा वापर करण्यात आल्यामुळे डोळ्याचे, त्वचेचे विकार होणार नाहीत आरोग्याची काळजी घेऊन अशाप्रकारे पर्यावरणीय प्रदूषण रहीत होळी साजरी करण्यात यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेशजी निर्मळ, प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरवादी नेते रविंद्रजी निर्मळ तसेच प्रभारी मुख्याध्यापक श्री.चव्हाण रमेश,सहशिक्षक श्री.चौरे बी. बी.,श्रीमती कुलकर्णी एम.बी.,श्रीमती कदम एस.एन.,सुत्रसंचालन श्री.अमर पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रमेश चव्हाण यांनी केले.