आरोग्य

बदाम खाण्याचे फायदे,भिजवून खावे की भाजून खावे ?


बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते सर्वात लोकप्रिय सुपरफूड आहे. बदामाला सुक्या मेव्यांचा राजा देखील म्हणतात. लहानपणापासूनच आपल्याला बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. ‘मुठभर बदाम खा आणि रोगांपासून लांब राहा असे म्हटले जाते.

बदामात प्रथिने, फायबर, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स सारखे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. ते आपल्या शरीराला संपूर्ण पोषण प्रदान करतात. बदाम हे किंचित गरम स्वभावाचे असल्याने ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हिवाळ्यात देखील बदाम भिजवून खावे की इतर मार्गाने खावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती.

 

बदाम हे भिजवून खाण्याचा सल्ला योग्य मानला जातो. पण ऋतू कोणताही असो, कितीही थंडी असो, बदाम भिजवल्यानंतरच सेवन करावे. काही लोक हिवाळ्यात गरमागरम भाजलेले बदाम खातात. पण तुम्ही असे रोज करणे टाळले पाहिजे. भाजलेले बदाम काही गोष्टींमध्ये औषधासारखे काम करतात. जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला असेल तर तेव्हा तव्यावर भाजलेले बदाम खाणे खूप फायदेशीर ठरते. पण जर तुम्ही रोज बदाम खात असाल तर हिवाळ्यातही बदाम भिजवल्यानंतरच सेवन करावे. तुमच्या जिभेची चव वाढवण्यासाठी तुपात भाजलेले आणि मिठ आणि मिरपूड घालून बदाम खाऊ शकता, परंतु हे दररोज करणे योग्य नाही.

 

ऋतू कोणताही असला तरी बदाम खाण्याचे फायदे अनेक आहेत. हिवाळ्यात तुम्ही दररोज मूठभर भिजवलेले बदाम खाल्ले पाहिजे. यामुळे तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेय. यामुळे आजारांचा धोका देखील कमी होतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी करणे, वजन नियंत्रित करणे, हृदयाचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य यासाठी देखील बदाम खाणे खूप फायदेशीर आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *