आरोग्य

शरीरात कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पेयाचे नियमित करा सेवन, पचनक्रिया सुधारण्यास होईल मदत


सतत बाहेरचे पदार्थ, तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू लागल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने बनवलेले, जंक फूड, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो.

पचनसंस्था बिघडल्यामुळे गॅस, अपचन होणे, सतत पोटात दुखणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. अनेक लोक पचनक्रिया बिघडल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा इतर बाजारात मिळणाऱ्या औषधांचे सेवन करतात. पण सतत औषध खाण्यापेक्षा घरगुती आणि आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला शरीरात कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात कोणत्या पेयाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

 

एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि ओवा भिजत घालून रात्रभर तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाण्याचा रंग बदलेल असेल. रात्रभर भिजत ठेवलेले पाणी टोपात ओतून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. पाणी अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तसेच पचनासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.

 

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी गोळ्या औषध खाण्यापेक्षा घरगुती उपाय करावे. बडीशेप ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारते. पचनक्रिया बिघडल्यामुळे काहीवेळा पोटाला सूज येण्याची शक्यता असते. पोटाला आलेली सूज कमी करण्यासाठी ओवा बडीशेपच्या पाण्याचे सेवन करा.

 

वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू वजन वाढू लागते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात ओवा बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये मेटाबॉलिजमला असते, ज्यामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते. ओव्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते.

 

अ‍ॅसिडिटी ही सामान्य समस्या आहे. आजकाल सगळ्यांचं अ‍ॅसिडिटीचा त्रास होत आहे. शरीरात अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढल्यानंतर गॅस होणे, अपचन होणे, पोटात दुखणे, आंबट ढेकर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित ओवा, बडीशेपचे पाणी प्यावे. बडीशेप पोटातील आम्ल युक्त पदार्थाना शांत करते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *