टॅबलेट्सच्या पाकिटांवर ही लाल रेषा का असते? काय आहे Rx चा अर्थ?काय आहे NRx चा अर्थ?XRx चा अर्थ?
डॉक्टरकडे जाऊन मेडिकलमधून औषधं घेणाचं प्रमाण आता खूप वाढलं आहे. आधी लोकांच्या पर्स किंवा बॅगमध्ये आवश्यक वस्तू राहत होत्या. आता लोकांकडे औषधांचा एक वेगळा बॉक्स असतो. त्यात वेगवेगळ्या समस्यांसाठी औषधं असतात.
तुम्हीही अनेकदा औषधं घेतली असतील. पण तुम्ही कधी गोळ्यांच्या स्ट्रीपवरील लाल रेष बघितली आहे का? जर बघितली असेल तर त्याचा अर्थ तरी माहीत आहे का? आम्हाला खात्री आहे की, अनेकांना याचा अर्थ माहीत नसेल, तोच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्ट्रीपवर का असते ही लाल रेषा?
रिपोर्टनुसार, गोळ्यांच्या ज्या पॅकेटवर अशाप्रकारची लाल लाइन असते, ती औषधं तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये. केमिस्टना ही औषधं विकण्याची परवानगी केवळ तेव्हाच दिली जाते जेव्हा या औषधांसाठी एखाद्या डॉक्टरने तुम्हाला चिठ्ठी दिली असेल.
अॅंटीबायोटिक औषधांच्या दुरूपयोगावर लक्ष ठेवण्यासाठी औषधांच्या पॅकेटवर लाल रेषा दिली जाते. स्ट्रीपवर लाल रेषा देण्याचा उद्देश टीबी, मलेरिया, लघवीसंबंधी संक्रमण आणि इतकंच काय तर एचआयव्हीसहीत अनेक गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा थेट केमिस्टकडून अॅंटीबायोटिकच्या खरेदी-विक्रीला रोखणं हा आहे.
आरोग्य आणि परिवार मंत्रालयानुसार, अशाप्रकारची औषधं खासकरून अॅंटीबायोटिक्स ज्यांच्या पॅकेजिंगवर लाल रेषा असते, त्यांचा वापर एखाद्या योग्य डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीही करू नये. जागरूक रहा, सुरक्षित रहा.
काय आहे Rx चा अर्थ?
आता आपण बघुया की, काही औषधांच्या पॅकेटवर Rx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारचं औषध घेतलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
काय आहे NRx चा अर्थ?
काही औषधांच्या पॅकेटवर NRx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे नशेचं औषध आहे आणि हे केवळ तेच विकू शकतात ज्यांच्याकडे याचं लायसन्स आहे.
XRx चा अर्थ?
काही औषधांच्या पॅकेटवर XRx असं लिहिलेलं असतं. हे एक असं औषध आहे जे केवळ डॉक्टर विकू शकतात आणि त्यांच्याकडे यांचं लायसन्स असावं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध मेडिकल स्टोरमधून खरेदी करू शकत नाही. भलेही तुमच्याकडे डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठीही असेल तरी.