जनरल नॉलेज

रोव्हर लँडरपासून किमान 100 मीटर अंतरावर,ऑटोमेशन सिस्टमद्वारे हे रोव्हर स्लीप मोडमध्ये


भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान मोहीम फत्ते झाली असून प्रत्येक भारतीयांसाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. चंद्रावरील दिवस संपेपर्यंत रोव्हरने जे काम करणे अपेक्षित होते ते काम रोव्हरने पूर्ण केले आहे.

आता पुढील दिवस सुरू होईपर्यंत ऑटोमेशन सिस्टमद्वारे हे रोव्हर स्लीप मोडमध्ये सेट करण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चांद्रयान – ३ मोहिमेतील हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा भारताने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

“रोव्हरने आपलं काम पूर्ण केलं आहे. ते आता सुरक्षितपणे पार्क केले असून स्लीप मोडमध्ये सेट केले गेले आहे. APXS आणि LIBS पेलोड्स बंद आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर प्रसारित केला जाईल. सध्या रोव्हरची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे. तर चंद्रावरील पुढच्या 22 सप्टेंबर 2023 रोजीच्या सुर्योदया वेळी सुर्य प्रकाश घेण्यासाठी रोव्हरवर सोलार पॅनेल सेट करण्यात आले आहेत.” असं ट्वीट इस्रोने केलं आहे.

“रोव्हरवरील रिसीव्हर चालू ठेवला आहे. रोव्हरच्या चंद्रावरील पुढच्या सुर्योदयानंतरच्या अपडेटची आशा आहे. अन्यथा भारताचे राजदूत म्हणून ते चंद्रावर कायमचे राहील” असं ट्वीट इस्रोने केलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *