संपादकीय

सायंटिस्ट हादरले ! पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या;जिन्यावरून उडी घेतली


काही ना काही कारणावरून मनुष्यच नाही तर पक्षी-प्राणीदेखील आपले आयुष्य संपवून घेतात. परंतू, दक्षिण कोरियातील एका घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. एका रोबोटने आत्महत्या केली आहे.

 

कामाचा ताण आल्याने त्याने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. वाचायला आश्चर्यकारक असले तरी ही खरोखरच घडलेली घटना आहे.

 

मध्य दक्षिण कोरियातील नगर पालिकेने याबाबत माहिती दिली आहे. या रोबोटने स्वत:ला जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली पाडले आहे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे नगर पालिकेने जाहीर केले आहे. डेली मिररने याचेवृत्त दिले आहे. यानुसार हा रोबो नगर पालिकेच्या कामांमध्ये मदत करायचा. गेल्या वर्षभरापासून हा रोबो गुमी शहराच्या नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये मदत करायचा. गेल्या आठवड्यात तो शिडीवरून निष्क्रीय अवस्थेत खाली पडला. तो अॅक्टीव्ह नव्हता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो त्यापूर्वी इकडे तिकडे फिरत होता. काहीतरी गडबड असल्यासारखे वाटत होते.

 

रोबोट कामाच्या ताणामुळे तणावात होता, असेही सांगितले जात आहे. यामुळे नेमकी काय परिस्थिती उद्भवली याचा तपास केला जाणार आहे. रोबोटचे विखुरलेले पार्ट एकत्र करण्यात आले आहेत, त्याला ज्या कंपनीने बनविले आहे ती यावर अभ्यास करेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा रोबोट कॅलिफोर्नियाच्या बिअर रोबोटिक्सद्वारे बनविण्यात आला होता. तो सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत काम करायचा. हा रोबोट लिफ्ट बोलवू शकत होता तसेच एकापेक्षा अनेक फ्लोअरवर ये जा करू शकत होता.

 

दक्षिण कोरियामध्ये जगातील सर्वाधिक रोबोट वापरले जातात. तिथे १० कर्मचाऱ्यांमागे एका रोबोट असतो. स्थानिक वृत्तपत्रांनीही या घटनेचे वृत्तांकन केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *