महाभारतात अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं.
आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.
१८ अध्याय आणि सुमारे ७२० श्लोक गीतेत सांगण्यात आले आहेत. आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहाणार आहोत.
काय सांगतात श्रीकृष्ण?
श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की वाढत्या वयामुळे प्रत्येक व्यक्तीला हे लक्षात येते की त्याने कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे आणि कोणत्या नाही. काही काळानंतर माणसाच्या लक्षात येते की ज्यांचे त्याच्या आयुष्यात कोणतेही योगदान नव्हते त्यांना त्या व्यक्तीने अनावश्यकपणे महत्त्व दिले आहे.
जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि आपले सर्व निराशा, दु:ख आणि संकटं परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. कारण परमेश्वराच्या चरणी आल्याने जीवनातील सर्व समस्या संपतात.
श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. जेव्हा राग येतो तेव्हा माणसाचे स्वतःवर नियंत्रण नसते आणि रागाच्या भरात त्याच्या हातून चुकीच्या गोष्टी घडतात.
गीतेनुसार, जीवनात कोणताही निर्णय कधीही रागाच्या भरात घेऊ नये कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे असतात. या निर्णयांमुळे माणसाला नंतर खूप पश्चाताप होतो. म्हणूनच राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा.
श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याला त्याच्या कर्मांचे फळ मिळते. म्हणूनच परिणामांचा विचार न करता केवळ योग्य कृतींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
( लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून नवगण न्युज24 याची पुष्टी करत नाही. )