कोल्हापूरक्राईम

कोल्हापूर हादरलं! ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच घात केला


Crime News : महिला आणि लहान मुलींच्या अत्याचारात वाढ झाल्याचे समोर आले आहे. परिणामी स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

अशातच कोल्हापूर येथील शिये येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या घरापासून जवळच असलेल्या शेतात नाल्याकाठी हा मृत्युदेह आढळून आला आहे. या मुलीबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

शिये इथल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करूनच तिचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मुलीच्या आईच्या वहिनीच्या भावानेच (जवळच्या नातेवाईकाने) हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कुटुंबासोबत राहणाऱ्या नातेवाईकानेच घात केला. अवघ्या 5 तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अत्याचार केल्यानंतर रडल्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने तिला संपवल्याची आरोपीची कबुली. आज सकाळी शेतात 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

 

नातेवाईकानेच केला घात

 

ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच घात केला. मुलीचे आई-वडील नातेवाईकाच्या स्वाधीन मुलीला करून कामावरती गेले होते. मुलींकडे लक्ष देऊन त्यांना दिवसभर सांभाळण्याच्या सूचना त्याला दिल्या होत्या. घरी परतल्यानंतर मुलगी दिसली नसल्याने आई-वडील कासावीस झाले होते. नातेवाईकाकडे चौकशी केली असता मुलगी खेळायला न सांगता निघून गेल्याचं सांगत उडवा उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यामध्ये मुलगीसह काळा पँट घालणार इसम दिसून आला. पोलिसांनी सेम वर्णणाच्या 6 जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पहिल्यापासूनच संशय बळवलेल्या नातेवाईकाने पोलीसी खाक्या मिळतात गुन्ह्याची कबुली दिली. संध्याकाळी 4 ते 6 वाजताच्या दरम्यान हा गुन्हा घडला. अत्याचार केल्यानंतर मुलगी जोरात रडल्याने तिचा गळा दाबून खून करण्यात आला. खून केल्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात नातेवाईक घरात वावरत होता.

 

बुधवारपासून बेपत्ता

 

बुधवार (21 ऑगस्ट) दुपारपासून मुलगी बेपत्ता होती. पोलिसांनी डॉग स्कॉडच्या माध्यमातून शोध घेतला असता थेट मृतदेह आढळून आल्याने मुलीच्या कुटुंबीयांना धक्का बसला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट देऊन आढावा घेतला तर फॉरेन्सिक टीमने घटनस्थळाचे नमुने घेतले आहेत. मुलीचे कुटुंबीय हे परप्रांतीय असून मामाकडे मुलीची जबाबदारी देऊन मुलीची आई वडील कामावरती गेले होते. संध्याकाळी ते घरी परतल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याने शोधा शोध सुरू केली. मात्र काल रात्री ती आढळून नाल्याने आज सकाळी पुन्हा पोलिसांनी शोध सुरू केला असता तिचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार पुढील तपासासाठी मुलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *