क्राईम

बहिणीवर झालेल्या बलात्काराचा भावाने घेतला भयानक बदला, पोलीसही हादरले


Crime News : आग्रा-महिला आणि मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी सध्या देश हादरून गेलाय. घटना असो नाहीतर बदलापुरातील घटना. महिला व मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचं सध्या चित्र दिसतंय.

कायद्यांच्या अंमलबजावणीतील फोलपणा, प्रशासनाची दिरंगाई, न्यायदानातील पळवाटा यांचा फायदा सूडानं पेटलेले, मानसिक विकृती असलेले गुन्हेगार घेतात. उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये अशाच स्वरूपाची एक घटना उघडकीस आली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा इथं बहिणीवर झालेल्या बलात्काराचा सूड उगवण्याच्या हेतूनं एका व्यक्तीनं दुष्कृत्य केलं. गुन्ह्याचा बदला म्हणून गुन्हाच करणाऱ्या त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, तुरुंगात पाठवलं आहे. बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी त्यानं आरोपीच्या बहिणीवर बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. पीडित तरुणीच्या भावानं आरोपी तरुणाच्या बहिणीशी गोड गोड बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जुन्या वादातून घडली असावी असा पोलिसांचा संशय होता, मात्र चौकशी केल्यानंतर ते सगळे आरोप खरे असल्याचं आढळून आलं.

घटनेनंतर आता पीडित तरुणीचा भाऊही बलात्काराच्या आरोपीखाली तुरुंगात गेला आहे. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार महामार्गावरील एका हॉटेलमध्ये घडला. आरोपी तरुणाच्या बहिणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या तरुणीवर अत्याचार केल्यामुळे तिचा भाऊ तुरुंगात आहे, त्या तरुणीच्या भावानं तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकरणात आधी पोलिसांना पीडित तरुणीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. ती आपल्या भावाला वाचवण्यासाठी खोटी गोष्ट तयार करते आहे, असं त्यांना वाटलं, पण नंतर पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फूटेज तपासलं, तेव्हा त्यांना ती तरुणी खरं सांगत असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. डिजिटल पुराव्याच्या आधारे आरोपीला पकडण्यात आल्याचं सिकंदरा पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार शर्मा यांनी सांगितलं.

देशाच्या विविध भागांत लैंगिक अत्याचाराच्या अशा कित्येक घटना घडत आहेत. प्रत्येक घटनेमागची कारणं वेगवेगळी असली तरी वास्तव हेच आहे की या घटना सातत्यानं समाजात घडत आहेत. उत्तर प्रदेशातील या घटनेत एका व्यक्तीनं बहिणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा सूड घेण्यासाठी आरोपीच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र पोलिसांनी त्यालाही अटक करून तुरुंगात पाठवलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *