क्राईम

फेरे घेताच नवरीला अटक; सत्य जाणून नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली…


Crime News : लखनऊ -एका लग्नाची अतिशय अजब आणि धक्कादायक कहाणी समोर आली आहे. साहूपुरी येथील एका घरात एका मुलीचं मथुरेतील मुलाशी लग्न झालं. पंडितांनी मंत्रोच्चार केला आणि वधू-वराने सात फेरेही घेतले.

लग्नाला वधू-वर पक्षाचे लोक उपस्थित होते. मात्र, संध्याकाळी नवरीच्या भावाने विचित्र मागणी केली. बहिणीला घेऊन आधी विंध्यालयात जाणार आणि तिकडून आल्यानंतरच तिची पाठवणी करणार, असा आग्रह नवरीच्या भावाने धरला. तो तिला जबरदस्तीने आपल्या सोबत घेऊन जाऊ लागला.

मथुरेहून आलेल्या वराच्या बाजूच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी वधूसह रामनगर पोलीस ठाणं गाठलं तेव्हा या टोळीचा प्लॅन उघड झाला. पोलिसांनी कथित नवरीची चौकशी करून रात्री उशिरापर्यंत टोळीची माहिती गोळा केली. मथुरा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सूरजचं लग्न वाराणसीच्या रामनगरमध्ये प्रयागराज येथील एका मध्यस्थामार्फत निश्चित करण्यात आलं होतं. सूरज शुक्रवारी सकाळी त्याचे काका पन्नालाल जैन आणि इतर कुटुंबीयांसह वाराणसीला आला. सर्वजण कॅन्टमधील हॉटेलमध्ये थांबले.

नियोजित वेळेनुसार वराच्या बाजूचे लोक पडाव येथील साहुपुरी येथील एका घरात पोहोचले, जे वधूचं घर असल्याचं सांगण्यात आलं. लग्नापूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी 1 लाख 50 हजार रुपये घेतले, त्यानंतर लग्नाचे विधी पार पडले. वराकडील लोक वधूसह छावणीतील एका हॉटेलमध्ये पोहोचले. तेथून सर्वजण संध्याकाळी उशिरा मथुरेला जाण्याच्या तयारीत होते. सर्वजण ऑटोमध्ये बसले आणि कॅन्ट स्टेशनला जाण्यासाठी निघाले तेव्हा एक तरुण तरुणीचा भाऊ असल्याचं सांगत तिथे आला.

तो म्हणाला, की आधी नवरीला विंध्याचलला भेट द्यावी लागेल, त्यानंतरच तिची पाठवणी होईल. नवरदेवाकडील लोकांना हे पटलं नाही आणि बराच वेळ यावर चर्चा झाली. इतक्यात या नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न केला. फसवणुकीच्या भीतीने वराच्या बाजूच्या लोकांनी वधूच्या भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी भाऊ पळून गेला.

हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर पोलिसांनी प्रथम चांदौलीची घटना असल्याचं ती सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मथुरेतील लोक ठाम होते आणि वरून फोन आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी या फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *