क्राईम

विधवा वहिनीशी लग्न केलं, नेपाळला गेला; परत आल्यावर दिराला मिळाली जीवघेणी…


भावाच्या मृत्यूनंतर एकट्या पडलेल्या वहिनीला आधार देण्यासाठी, विधवा वहिनीशी लग्न करणं एका इसमाला फारच महागात पडलं आहे. त्या एका निर्णयामुळे त्याच्या जीवावरच बेतलं. ही घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील आहे.

हैराण करणारी आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या इसमाचा जीव घेणारे लोक दुसरे-तिसरे कोणी नाहीत, तर त्याच्या घरचे आहेत. त्याची निर्घृणपणे हत्या करून त्यांनी त्या इसमाचा मृतदेह थेट बागेत फेकून दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मृत इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे, पण त्याच्या घरच्यांनीच त्याचा खून करून मृतदेह बागेत फेकल्याचा आरोप त्या इसमाच्या सासरच्या लोकांनी केला आहे.

8 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

आपल्या विधवा वहिनीशी लग्न करणाऱ्या धाकट्या मेव्हण्याला जीवघेणी शिक्षा मिळाली. या घटनेनंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी मृतदेह चादरीत गुंडाळून घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या बागेत फेकून दिला. वैशाली जिल्ह्यातील बेलसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैन गावात ही घटना घडली. मृत हा सायन गावचा रहिवासी असून रामकुमार महतो असे त्याचे नाव आहे. रामचा विवाह मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कुधनी येथील किशूनपूर मोहिनी गावात झाला.

राजकिशोर सिंह यांनी 8 वर्षांपूर्वी त्यांची मुलगी नीतूचा विवाह रामसोबत लावून दिला. मृताचा मेहुणा विकास कुमार यांनी सांगितले की, त्याच्या बहिणीच्या पहिल्या नवऱ्याचा 10 वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मात्र भावाच्या मृत्यूनंतर रामने आपल्या विधवा वहिनीशी लग्न केले.

लग्नामुळे कुटुंबीय होते नाराज

पहिल्या पतीच्या निधनानंतर नीतूसोबत एवढं मोठ आयुष्य घालवण्यासाठी कोणीच जोडीदार नव्हता. ती दोन वर्षे सासरी राहिली. अशा वेळी रामने आपल्या विधवा वहिनीशी लग्न केले, पण राम आणि नीतूच्या लग्नामुळे त्याचे कुटुंबीय मात्र आनंदी नव्हते. ते छोट्या-मोठ्या गोष्टींवरून त्यांना टोमणे मारायचे, त्रास द्यायचे. काही वेळा तर त्याचे कुटुंबीय दोघांनाही मारहाणदेखील करायचे.
कुटुंबीयांकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून रामने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी पाठवलं आणि तो स्वतः मजूर म्हणून नेपाळला कामासाठी गेला.

दोन दिवसांपूर्वीच घरी आला पण..

ही दुर्दैवी घटना घडण्याच्या दोन दिवस आधीच राम त्याच्या घरी आला होता. मात्र तेव्हाी त्याचे कुटुंबियांसोब मोठं भांडण झालं. आपल्या जावयाची हत्या करण्यात आली आहे, असा रामच्या सासरच्या मंडळींचा आरोप आहे. मात्र त्याने स्वत:च गळफास लावून आयुष्य संपवलं, असं घरच्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *