क्राईम

Crime News: सून आंघोळ करताना सासरा शूट करायचा Video


Crime News: मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सुनेने सासरच्या मंडळींवर अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. याप्रकरणी विवाहितेने पती आणि सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पती आणि सासरा मिळून तिचा न्यूड व्हिडिओ बनवतात, असा गंभीर आरोप महिलेने केला आहे. एवढेच नाही तर ती आंघोळ करत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला आहे. याशिवाय सासरकडील मंडळी हुंड्याची मागणी करत असल्याचंही तिने पोलीस तक्रारीत म्हटलंय. याशिवाय तिने असाही आरोप केला आहे की, आरोपींनी तिचा न्यूड व्हिडिओ देखील व्हायरल करण्याची धमकी दिली होती. (father in law makes a video while bathing also sexually abuses her newly married daughter in law reaches police station against her father in law)

सुनेची सासऱ्यांविरोधात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

हे संपूर्ण प्रकरण मेरठच्या कंकरखेडा पोलीस स्टेशन भागातील आहे. जिथे एका महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. 3 वर्षांपूर्वी लग्न होऊन सासरच्या घरी आलेल्या महिलेने सासरा आणि पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.

महिलेचे म्हणणे आहे की, तिचा 3 वर्षांपूर्वी पती मोहित (बदललेले नाव) याच्यासोबत विवाह झाला होता. तिचा नवरा हा एका खासगी शाळेत काम करतो. दरम्यान, लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला.

सुनेचे गंभीर आरोप

महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये जायची तेव्हा तिचे सासरे आणि पती लपून तिला पाहायचे. एवढेच नाही तर सासरे आणि पती यांनी मिळून तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट केला होता. एके दिवशी जेव्हा तिने सासरा आणि नवरा अशा प्रकारचं कृत्य करत असल्याचं पाहिलं तेव्हा आरोपींनी तिला Video व्हायरल करण्याची धमकी दिली.

सुनेने असाही आरोप केला आहे की, तिने आपल्या पतीला आणि सासऱ्याला जेव्हा विरोध केला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली. 13 मार्च 2024 रोजी देखील अशीच मारहाण झाल्याचं तिने तक्रारीत नमूद केलंय. तसेच तिचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप देखील केला आहे.

याप्रकरणी मेरठचे एसपी (शहर) आयुष विक्रम म्हणाले, ‘कंकरखेडा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. हुंडा प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे. त्यानुसार आता कायदेशीर कारवाई केली जात आहे.’


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *