Crime News : ‘माता न तू वैरिणी’ आईचे प्रियकराशी अवैध संबंध, प्रियकरासह मिळून मुलीची गळा आवळून हत्या..
Crime News : उत्तराखंडच्या राजधानीचं शहर असलेल्या डेहराडूनमध्ये खुनाची एक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर ‘माता न तू वैरिणी’ म्हणायची वेळ आली आहे. कारण जन्मदात्या आईनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या 18 वर्षांच्या मुलीचा खून केला.
यानंतर त्यांनी ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे.
आपल्या आईचे प्रियकराशी अवैध संबंध असल्याचं समजल्यानंतर मुलीला मृत्युदंड मिळाला. आईने प्रियकरासह मिळून आपल्या मुलीची गळा आवळून हत्या केली. खून लपविण्यासाठी मारेकऱ्यांनी ती आत्महत्या असल्याचं भासवण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. डेहराडूनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शुक्रवारी नवीन ट्विस्ट आला. पोलीस तपासात मुलीने आत्महत्या केली नसून, अनैतिक संबंध लपवण्यासाठी तिच्या आईने प्रियकरासोबत मिळून तिचा खून केला, अशी माहिती उघडकीस आली आहे. खून केल्यावर तिच्या मृतदेहाला गळफास लावून या घटनेला आत्महत्येचं स्वरूप देण्यात आलं. गुरुवारी सकाळी नई बस्ती पटेल नगरमध्ये एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सुखविंदर सिंह यांची 20 वर्षांची मुलगी ममता हिचा मृतदेह फासावरून काढून जमिनीवर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला, असं एसएसपी अजय सिंह यांनी सांगितलं.
सुखविंदर सिंह हा दूध सप्लायचं काम करतो, असं पोलिसांना कळालं. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी पहाटे चार वाजता कामावर गेला आणि पाच वाजता आपण मुलीला लटकलेलं पाहिलं, असं तिच्या आईने सांगितलं. तिनेच फासावरून तिला खाली उतरवलं असं ती म्हणाली. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि बिंग फुटलं.
आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं मुलीने
पटेलनगरचे इन्स्पेक्टर के. के लुंठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे शेजारी राहणाऱ्या नितीनसोबत अनैतिक संबंध होते. खुनाच्या चार-पाच दिवसांपूर्वी ममताने तिची आई आणि नितीनला घरात आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. याबाबत वडिलांसह इतर लोकांना सांगणार असल्याचं तिने म्हटलं होतं. यानंतर ममताची आई आणि प्रियकराने मिळून तिसा मारण्याचा प्लॅन केला. याआधीही सुखविंदरला त्याच्या मुलीमार्फत हरप्रीत आणि नितीन यांच्यातल्या अनैतिक संबंधांबद्दल समजलं होतं. त्यानंतर घरात भांडण झालं होतं. त्यानंतर आरोपी महिलेने नितीनला पुन्हा भेटणार नसल्याचं सांगून वाद मिटवला होता.