क्राईमछत्रपती संभाजीनगर

संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई, सापळा लावून मंगळसुत्र चोरांना ठोकल्या बेड्या; 10 गुन्हे उघडकीस


गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळसुत्र चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान अशा मंगळसुत्र जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तर ताब्यात घेण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींकडून मंगळसुत्र जबरी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्या ताब्यातून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. संतोष पांडुरंग इष्टके, (वय 29 वर्ष, रा. कायगांव, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), निखील बाबासाहेब कुऱ्हे, वय 21 वर्ष, रा. मौजे राघु हिवरे, शनीशिंगनापुरचे जवळ, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे या दोन्ही आरोपींचे नावं आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसापासुन मंगळसुत्र जबरी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने घडलेल्या घटनांचे विश्लेषण करुन छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या मंगळसुत्र जबरी चोरीच्या ठिकाणाचा आभ्यास केला. ज्यात सर्व घटनांमधील कार्यपद्धत ही एक सारखीच असल्याचे व मंगळसूत्र जबरी चोरी करणारे व्यक्ती हे एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपींना पकडण्यासाठी सपुर्ण शहरात सापळा लावण्यात आला होता.

याचवेळी आज (8 जून) रोजी ए एस क्लब ते नगर नाका रोडवरील छावणी उड्डाणपूलाजवळून दोन संशयित व्यक्ती मोटार सायकलवर बसून शहरात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी दिलेले उत्तर ऐकून पोलिसांना संशय आला. त्यामुळे या दोन्ही संशयित तरुणांची चौकशी केली असता त्यांनी शहरात मंगळसुत्र जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले. तर या दोन्ही आरोपींकडून मंगळसुत्र जबरी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्या ताब्यातून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकुण 10 मंगळसुत्र 10 तोळे 05 ग्रॅम 360 मिली वजनाचे ज्याची किमत 6 लाख 30 हजार रुपये आहे. तर एक बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण 8 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्येमला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस ठाणे एम वाळुज येथील 03, सातारा येथील 03, क्रांतीचौक येथील 02, पुंडलीकनगर येथील 01 व छावणी येथील 01 असे एकुण 10 मंगळसुत्र जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

मंगळसूत्र वेगवेगळ्या सराफा विक्रेत्यांना विकले…

विशेष म्हणजे या दोन्ही आरोपींनी चोरी केलेले मंगळसूत्र वेगवेगळ्या सराफा विक्रेत्यांना विकल्याचे देखील समोर आले आहेत. ज्यात बाबुसेठ ज्वेलर्स (गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, धुळदेव ज्वेलर्स (कमळापुर रोड, रांजनगांव), कृष्णा ज्वेलर्स (गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), ओम ज्वेलर्स (बजाजनगर वाळूज, गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर) यांना विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत.

यांनी केली कारवाई…

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते व सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे, सपोनि. काशीनाथ महांडुळे, पोउपनि प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार नवनाथ खांडेकर, योगेश नवसारे, विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, अवलिंग होनराव, राजेंद्र साळुंके, अमोल शिंदे, राहुल खरात, सुनिल बेलकर, महिला अंमलदार दिपाली सोनवणे व गिता ढाकणे, चालक पोउपनि अजहर कुरेशी, ज्ञानेश्वर पवार सर्व नेमणुक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *