क्राईम

मणिपूर हिंसाचारात सुमारे 98 जणांचा मृत्यू, अमित शाहांच्या आवाहनानंतर नागरिकांकडून 140 शस्त्रास्त्रांचं समर्पण


मणिपूरमध्ये एका महिन्यापूर्वी उसळलेल्या हिंसाचारात सुमारे 98 जणांचा मृत्यू झाला आणि 310 जण जखमी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.

मणिपूर सरकारने 2 जून रोजी एका निवेदनात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्या 272 मदत छावण्यांमध्ये एकूण 37,450 लोक आश्रयाला आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यात गेल्या महिन्यामध्ये हिंसाचार उफाळून आला होता.

मणिपूर हिंसाचारात 98 जणांचा मृत्यू

ईशान्येकडील मणिपूर राज्य हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. मणिपूर हिंसाचारानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आवाहनाचा परिणाम दिसून येत आहे. तेथील लोकांनी 140 शस्त्रे परत केली आहेत. सरकारने जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, “हिंसाचारातील मृत्यूंची संख्या 98 आहे आणि जखमींची संख्या 310 आहे.” गेल्या एका महिन्यात, राज्य पोलिसांनी 3,734 गुन्हे दाखल केले आहेत आणि हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल 65 लोकांना अटक केली आहे, असंही निवेदनात सांगितलं आहे.

शस्त्रे आणि दारूगोळा आत्मसमर्पण करण्याचं आवाहन

मणिपूर राज्यात 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून एकूण 4,014 जाळपोळीच्या घटना घडल्याची माहितीही सरकारने दिली आहे. सरकारने लोकांना हिसकावलेली शस्त्रे आणि दारूगोळा आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे. सरकारने निवेदन जारी करत म्हटलं आहे की, “कोणत्याही व्यक्तीला हिसकावून घेतलेली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह पकडले गेल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” आतापर्यंत, सुरक्षा यंत्रणांनी 144 शस्त्रे जप्त केली आहेत.

अमित शाहांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

मणिपूरमध्ये गेल्या महिन्यात सुरू झालेला हिंसाचार आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर लोकांनी मणिपूरच्या विविध ठिकाणांहून शेकडो शस्त्रे परत केली आहेत. शाह यांनी मणिपूर दौऱ्यात शस्त्रे समर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद राज्यातील विविध ठिकाणी लोकांनी 140 शस्त्रांचं पोलिसांनी समर्पण केलं आहे.

नागरिकांकडून 140 शस्त्रास्त्र समर्पण

मणिपूर पोलिसांनी सांगितलं की, नागरिकांनी आत्मसमर्पण केलेल्या 140 शस्त्रांमध्ये एसएलआर 29 (SLR 29), कार्बाइन, एके, इनसास रायफल, इनसास एलएमजी (Insas LMG), 303 रायफल, 9 एमएम पिस्तूल, 32 पिस्तूल, एम 16 रायफल, स्मोक गन आणि अश्रुधूर, स्थानिक बनावटीचे पिस्तूल, स्टन गन, रायफल, जेव्हीपी आणि जेव्हीपी ग्रेनेड लाँचर या हत्यारांचा समावेश आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *