America ( अमेरिका ) : नव्या महामारीचं संकट ! कोरोनाचा KP.3 व्हेरिएंट, भारतात काय आहे स्थिती?
America ( अमेरिका ) : जगभरात सगळीकडे 2020 मध्ये कोरोना विषाणूने थैमान घेतले होते. या विषाणूं अनेक लोक संक्रमित झाली होती. त्यातील अनेक लोकांचा मृत्यू झाल्याने जगभरात एकच खळबळ माजली होती.
पण पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. कोरोना विषाणूचे रुग्ण वाढल्याने रुग्ण व्यवस्थेची चिंता वाढली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये FLiRT आणि त्यानंतर आता KP.3 या नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आल्याने लोकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जगभरात नवीन विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने जगभरातील अनेक देश याकडे धोका म्हणून बघत आहेत.(फोटो सौजन्य-istock)
2020 मध्ये कोरोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. जगभरातील अनेक लोकांचा यामुळे मृत्यू देखील झाला होता. पण त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार KP.3 याचे रुग्ण आढळून आले आहेत. लास वेगासच्या प्रवासादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला होता. त्यांना या संसर्गाची सौम्य लक्षणे जाणवत होती. अमेरिकेमध्ये KP.३ विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. या विषाणूचे रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेमध्ये नवीन आलेल्या विषाणूचे 307 रुग्ण आढळून आले आहेत. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी दिलेल्या अहवालानुसार, यूएस मध्ये कोरोना विषाणूचे 23 जून ते 6 जुलै दरम्यान 36.9 टक्के रुग्ण हे KP.3 प्रकारातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या विषाणूचे थैमान
अमेरिकेमध्ये नव्याने आलेले विषाणू हा कोविड-19 च्या JN.1 प्रकारासारखा आहे. FLiRT प्रकारात KP.1 आणि KP.2 सारखीच लक्षणे दिसून आली आहेत.
डब्ल्यूएचओने दिलेल्या अहवालामध्ये म्हंटले आहे की, कोविड-19 विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अमेरिकेनेच नाहीतर इतर देशांनी सुद्धा सतर्क राहावे. कोवीड 19 अजूनही संपलेला नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या सगळ्यांनी कोविड-19 ची खबरदारी घ्यावी, लसीकरण करावे, मास्क वापरावे आणि शंका असल्यास वेळेत कोविड-19 चाचणी करून घ्यावी, असा इशारा डब्ल्यूएचओने दिलेल्या अहवालामध्ये देण्यात आला आहे.