कोरोनाचा प्रभाव कमी होऊन आता जगाने पुन्हा वेग धरला असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.
सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट एरीसने जगभरातील आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनमुळे तयार झालेला हा EG.5.1 व्हेरिएंट असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जून महिन्यात पहिल्यांदा या व्हेरिएंटला डिटेक्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर काही प्रमाणात या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले. 31 जुलै रोजी या व्हेरिएंटचे एका नव्या रूपात वर्गीकरण करण्यात आलं.
प्रत्येक सात नवीन कोरोना रुग्णांपैकी एकजण EG.5.1 याने संक्रमित असल्याचे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने सांगितले. आशियातील वाढत्या प्रकरणांमध्ये आता ब्रिटनमधील रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान आशियातील किती देशांमध्ये ARIS चे नवीन प्रकार आढळले आहेत., याची माहिती देण्यात आली नाही
जागतिक आरोग्य संस्थेचा सल्ला
EG.5.1 व्हेरिएंटची दखल जागतिक आरोग्य संस्थेने घेतली आहे.लसीमुळे लोक सुरक्षित आहेत, परंतु सावध रहा असा सल्ला WHO ने दिला आहे. मुख्य जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दोन आठवड्यांपूर्वी EG.5.1 प्रकाराचे निरीक्षण सुरू केले. लसीमुळे लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत, पण कोणत्याही देशाने कोरोनाविरूद्धची लढाई आणि सतर्कता कमी करू नये, अशी सूचना डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेबियस यांनी दिली.
नव्या व्हेरिएंटचा वृद्धांना अधिक धोका
UKHSA च्या रेस्पिरेटरी डेटामार्ट प्रणालीद्वारे नोंदवण्यात आलेल्या 4,396 नमुन्यांपैकी 5.4 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. गेल्या वेळी नोंदवण्यात आलेल्या 4,403 नमुन्यांपैकी केवळ 3.7 टक्के नमुन्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
त्याचबरोबर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ताज्या आकडेवारीवरून प्रति लाख लोकसंख्येमागे 1.97% कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. गेल्या UKHSA अहवालात हा दर 1.17% होता.
या आठवड्यात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली असून बहुतेक संक्रमित लोक वृद्ध आहेत, असे UKHSA मधील डॉ मेरी रॅमसे यांनी सांगितले. आम्ही सर्वकाही बारकाईने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
3 जुलै 2023 रोजी हॉरायझन स्कॅनिंग दरम्यान EG.5.1 केसेसमधूनन आम्हाला कोणत्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो याचे संकेत मिळाले. तेव्हापासून आम्ही त्यावर लक्ष ठेवू लागलो, असे UKHSA ने म्हटले आहे. 3 जुलै रोजी ते मॉनिटरिंग सिग्नल म्हणून पाहिले गेले, पण यूकेमध्ये जीनोमची वाढती संख्या आणि सर्व देशांमध्ये त्याचा वाढता वेग यामुळे 31 जुलै 2023 रोजी त्याचे व्हेरिएंट V-23JUL-01 म्हणून वर्गीकरण करण्यात आले. असे असले तरी त्याची लक्षणे अद्याप सांगण्यात आलेली नाहीत.