Video : व्हिडिओबीड शहर

Beed News : मृत्यूचा Live Video-पेट्रोल भरण्यासाठी आलेले शिक्षक जमिनीवर कोसळले ..


Beed News : बीड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने जागीच मृत्यू झाला. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

 

बीड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बाबासाहेब मिसाळ, असं मयत शिक्षकांच नाव आहे. ते बीडच्या वारोळा या आश्रम शाळेवर कर्तव्यावर होते. सकाळी बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता पेट्रोल भरण्याअगोदर ते खाली कोसळले. नागरिकांनी मिसाळ यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे सीसीटीव्हीत कैद झाले आहे, त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी ॲम्बुलन्स बोलावली. ॲम्बुलन्स बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

 

(नवगण न्युज24 हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट ईतर माहिती यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. नवगण न्युज24 कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून नवगण न्युज24 यांची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व नवगण न्युज24 स्वीकारत नाही.)

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *