Manoj jarange : बीड आमची मतं गोड वाटतात ! आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला न गेलेल्या ‘मविआ’ला जरांगेंनी फटकारल
Beed News : राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस विरोधी पक्षाचे नेते गैरहजर राहिले. त्यामुळे या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही.
त्यामुळे बुधवारी विधिमंडळात मोठा गदारोळ झाला. त्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला न गेलेल्या महाविकास आघाडीला आमची मतं गोड वाटतात का, असे म्हणत शेलक्या शब्दांत सुनावले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठ्यांनी मतदान केले आहे, हे विसरू नका. त्यावेळी मतदान घेताना तुम्हाला बरे वाटले, आता आरक्षणाच्या प्रश्नांवर बोलायला मात्र तयार नाहीत. तर सत्ताधारी आश्वासन देऊनही या मुद्द्यावर तोंड उघडण्यास तयार नाहीत. मात्र,आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास या सर्वांना परत जागेवर आणा, असे आवाहन यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी केले. (Manoj jarange News)
बीड येथे पार पडलेल्या मराठा बांधवाच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते.