बीड जिल्हा

मराठा आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण,बीडमध्ये पेटवल्या एसटी बसेस


बीड : मराठा आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. आंदोलकांनी एसटी बस पेटवल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. पण यातील प्रवासी सुखरुप आहेत.

बीडमधील सोलापूर-धुळे महामार्गावर ही बस पेटवण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही बस पेटवल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. बस पेटवून संबंधित व्यक्ती घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांना याची माहिती कळतात ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संभाजीनगरवरुन सोलापूरमार्गे जाणारी ही बस पेटवण्यात आल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं. बीड जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक पवित्र्यात आहेत. या बसचे कंडक्टर, ड्रायव्हर आणि प्रवाशी सुखरुप आहेत.

बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार बीड येथील बसस्थानकातून ८ वाजता नेहमीप्रमाणे कोल्हापूर बस (क्र. एमएच ०९ एफएल ००७५) मार्गस्थ झाली होती. दरम्यान आहेर वडगाव फाटा परिसरात जमावाने ही बस अडवून प्रवाशांना खाली उतरवून ती पेटवून देण्यात आली. ही बसचे संपूर्ण नुकसान झाले. याच दरम्यान मांजरसुंबा घाटात दुसऱ्या जमावाने अहमदपूर- छत्रपती संभाजी नगर बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू बस न थांबल्याने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे बसच्या इंजिनने पेट घेतल्याचे समजते. या बसमधील प्रवासी तातडीने सुखरूपपणे बाहेर पडले. दोन्ही बसमधील प्रवाशांनी मिळेल त्या वाहनातून बीड गाठले. माहिती मिळताच बीड ग्रामीण व नेकनूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, एसटीचे अधिकारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. दरम्यान पीड येथू जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या असून आरक्षण केलेल्या प्रवाशांना रिफंड मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *