पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू, मलेरिया टायफॉईडसारखे आजार डोकं वर काढतात. सध्याच्या वातावरणात अनेक लोकांना या संसर्गजन्य आजारांची लागण झाली आहे. या आजारांमध्ये ताप आल्यावर शरीरात वेदना, होतात आणि शरीर आखडतं.
मलेरिया डेंगीसारख्या आजारात प्लेटिलेट्स कमी होतात. यासाठी पपईच्या पानांचा वापर घरगुती उपाय म्हणून करता येतो. पपईच्या पानांच्या रसामुळे या समस्या दूर होऊ शकतात. पपईच्या पानांचे अनेक फायदे असले तरी डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड तापावर हा रामबाण उपाय आहे. पपईच्या पानांचा अर्क काढून त्यात लिंबाचा रस सेवन केल्याने ताप बरा होतो.
उत्तराखंडमधील डेहराडून येथील आयुर्वेदिक फिजिशियन डॉ. सिराज सिद्दीकी यांनी लोकल 18 ला सांगितले की, पपईच्या पानांमध्ये अँटीडेंगी, अँटीकँसर, अँटीडायबेटिक, न्यूरोप्रोटेक्टिव्ह आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पपईच्या पानांचा रस व्हायरल फिव्हर असलेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट काउंट आणि पांढऱ्या आणि लाल रक्तपेशी वाढविण्यास मदत करतो. पपईच्या पानांमध्ये सॅपोनिन, फिनोलिक संयुगे, अमिनो अॅसिड, लिपिड, ग्लाइकोसाइड्स, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड, कार्बोहायड्रेट्स, एंजाइम, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
पपईच्या पानांचा रस डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईडच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. रुग्णाने अर्धा कप कोमट पाण्यासोबत 30 मिली अर्क घ्यावा. याची चव कडू असते त्यामुळे तुम्ही थोडा गूळही घेऊ शकता.
केसांच्या वाढीसाठीही पपईच्या पानांचा रस फायदेशीर
पपईच्या पानांचा रस फक्त तापासाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. पपईच्या पानांचा रस काढून त्यात खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास केसांच्या वाढीस चालना मिळते. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतील.