आगळे - वेगळे

Viral News: 115 रुपयात Kiss आणि 11 रुपयात Hug; रस्त्यावर तरुणीने का थाटलंय विचित्र दुकान ?


Viral News : ऐकावं ते नवलं! अहो जेव्हा आपण बाजारात जातो तिथे तुम्हाला घरगुती वस्तू, फळं भाज्या आणि कपड्यांपासून इतर वस्तूंचे दुकानं दिसतात. इथे आपण मनसोक्त आठवडी बाजारात खरेदी करतो.

पण चीनच्या बाजारात एक अनोखा ट्रेंड पाहिला मिळतोय. इथे एक सुंदर तरुणीने दुकान थाटलंय आणि तेही प्रेमाच…हो अगदी बरोबर…या तरुणीने अनोख आणि धक्कादायक दुकानं थाटलंय. रस्त्यावर तिने एक मेनकार्ड लावलंय ज्यात तिने Kiss, Hug यासाठी ही तरुणी पैसे घेणार आहे. (Viral News Kiss at 115 rupees and Hug at 11 rupees woman set up shop on the street)

या स्टॉलवर पैसे मोजल्यावर रोमँटिक अनुभव देण्यात येतो. ज्यांना दीर्घ वचनबद्धतेशिवाय भावनिक संबंध हवे आहेत त्या लोकांना हा स्टॉल आकर्षिक करत आहेत. चीनमध्ये रेंटेड रिलेशनशिपची संकल्पना यातून वाढल्याची दिसून येत आहे. शेन्झेन सारख्या शहरांच्या रस्त्यावर, मुली रेट कार्ड घेऊन, चुंबन घेणे, मिठी मारणे आणि एकत्र चित्रपट पाहणे यासारख्या सेवा देताना दिसत आहेत. या प्रेमाच्या क्षणांची किंमत 11 रुपयांपासून ते 461 रुपयांपर्यंत आहे.

 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हे स्टॉल चीनमधील एक सामान्य दृश्य बनवलंय. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर व्हायरल होत आहेत. काही मुली पैसे कमावण्यासाठी या प्रकारच्या सशुल्क सहवासाकडे वळत आहेत. जरी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे परस्परसंवाद काटेकोरपणे घनिष्ठ नसतात. उदाहरणार्थ, साध्या मिठीची किंमत सुमारे 11 रुपये आहे, तर चुंबनाची किंमत 115 रुपये आहे.

 

याशिवाय, चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला 150 रुपये आणि घरगुती कामं करण्यासाठी 2000 रुपये मोजावे लागणार आहेत. सगळ्यात महाग पर्याय म्हणजे 4100 रुपये एक तास एकत्र मद्यपान करणे यासाठी आहे. या असामान्य प्रवृत्तीमुळे विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोक या कल्पकतेचं कौतुक करत आहेत तर काही लोक याला महिलांचा अनादर असल्याच म्हणत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *