Love : 23 वर्षीय मुलगी पडली 80 वर्षाच्या आजोबांच्या प्रेमात, लव्हस्टोरी ऐकून आवाक् व्हाल !
Love : प्रेम आंधळं असतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मात्र इतकं! या डायलॉगला साजेशे असे एक उत्तम उदाहरण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आजची प्रेमाची स्टोरी ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
लग्न करताना तुम्ही नवरा-नवरीमध्ये काही वर्षांचा फरक पाहिला असेल मात्र कपलमध्ये 57 वर्षांचा फरक तुम्ही कधीच पाहिला नसावा. आज आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या गोष्टीत एका 23 वर्षीय तरुणीने 80 वर्षीय व्यक्तीबरोबर लग्न केले आहे. याचे नक्की कारण काय, चला जाणून घेऊयात.
एक 23 वर्षीय तरुणी 80 वर्षांच्या आजोबांच्या प्रेमात पडली आणि नंतर त्यांनी लग्न केलं. ही बातमी पाहताच ती सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होऊ लागली. ही बातमी कुठली आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. ही बातमी आहे आपल्या शेजारील देश चीनची. सोशल मीडियावर या कपलची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होत आहेत. ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटने या जोडप्याची अनोखी लव्हस्टोरी जगासमोर आणली आहे.
तरुणीने जेव्हा एका आजोबांशी लग्नगाठ बांधण्याचा विचार करत असल्याचे तिच्या कुटुंबियांना सांगितले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कुटुंबाने तरुणीच्या या निर्णयाला विरोध केला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी तरुणीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध 80 वर्षीय व्यक्तीशी लग्न केले. यानंतर तरुणीने तिच्या कुटुंबाशी संबंध तोडले आणि तिच्या आजोबांच्या वयाच्या पुरुषाशी लग्न केले. त्यांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलं, पण त्यांच्या कुटुंबातील कोणीही या लग्नाला उपस्थिती नव्हती.
सोशल मीडियावर लोकांना जेव्हा हे समजले तेच सर्वच आवाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी चीनच्या हेबेई येथील वृद्धाश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत होती. याच वृद्धाश्रमात तिची आणि एका आजोबांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी एक दिवस लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरुणीला आजोबांचा स्वभाव खूप आवडला आणि आजोबांना मुलीचा लळा लागला.