Video : व्हिडिओआगळे - वेगळे

Video : 12 लाख रुपये खर्च करून माणूस बनला ‘कुत्रा’, पहिल्यांदाच घराबाहेर पडत खऱ्या प्राण्यांसमोर गेला अन्…


स्वत:चे विचित्र शौक पूर्ण करण्याकरता लोक काय नाही करत. मात्र त्यांनी केलेले हे प्रयोग आपल्याला थक्क करतात.

 

असेच जपानमधील एका व्यक्तीला प्राणी बनण्याची एवढी आवड निर्माण झाली की, सुमारे 12 लाख रुपये खर्च करून ती ‘कुत्रा’ बनली आहे. फोटो-व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

जपानच्या टोकोने 12 लाख रुपये खर्च करून खास पोशाख तयार केला आहे. जर कोणी हा पोशाख घातला तर तो पूर्णपणे कुत्र्यासारखा दिसेल. जेव्हा टोको हा पोशाख परिधान करून रस्त्यावर निघते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते. टोको अगदी ‘श्वाना’ सारखी दिसते. तीने ‘आय वॉन्ट टू बी अॅन अॅनिमल’ नावाचे यूट्यूब चॅनलही तयार केले असून तीचे 30 हजारांहून अधिक फालोअर्स आहेत.

माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले

आपल्या ट्विटर हँडलवरून ही बातमी शेअर करत टोकोने लिहिले की, अखेर माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले. मी लहान असल्यापासून मला स्वतःला श्वान म्हणून बघायचे होते. जेपपेट नावाच्या कंपनीकडून बनवलेल्या कोली ब्रिडच्या कुत्र्याचा पोशाख मला मिळाला असल्याचे तीने सांगितले. जेव्हा मी ते परिधान करून बाहेर जाण्याचा विचार केला तेव्हा लोक कसे प्रतिक्रिया देतील हे मला माहीत नव्हते. मी खूप घाबरलो होते. ती म्हणाला की जेव्हा मी पहिल्यांदा हा पोशाख परिधान करून बाहेर पडले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. माझे मित्र आणि कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटले.

दुसरीकडे, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टोकोने परिधान केलेल्या कुत्र्याच्या पोशाखाचे व्हिडिओ आणि फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *