पाकिस्तानच्या (Pakistan) लाहौर शहरात (Lahore) जोरदार बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 3 जण ठार ( 3 dead ) झाले असून 20 पेक्षा अधिक नागरिक गंभीर (More than 20 injured) जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.या स्फोटामुळे सध्या एकच खळबळ उडाली असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. लाहोरमध्ये मध्यवर्ती भागात हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. लाहौरच्या अनारकली बाजार परिसरात हा धमाका झाला. स्फोटांमागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान? या स्फोटांमागे तरहीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचा हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या स्फोटामुळे दीड फूट खोल खड्डा जमिनीत पडला होता. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती असेल, याची कल्पना येऊ शकते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. या स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूची घरं आणि दुकानांच्या काचा फुटल्या. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या अनेक वाहनांचं या स्फोटात मोठं नुकसान झालं आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्फोट झाल्यानंतर काही तासांतच तिघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची पाकिस्ताननं पुष्टी केल्याचं ‘डॉन न्यूज’ च्या बातमीत म्हटलं आहे. मात्र हा स्फोट अधिक शक्तीशाली होता आणि काही तासांनंतरच या घटनेचं खरं स्वरूप आणि गांभीर्य समजू शकेल, अशी माहिती देण्यात येत आहे. या स्फोटात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू या घटनेची पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.
या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं घेतलेली नाही. हा घातपात घडवण्यामागे कुणाचा हात होता, याचा तपास सध्या यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरचे नमुने फॉरेन्सिक टीमकडून गोळा करण्यात आले असून त्याचं पृथक्करण झाल्यावरच या घटनेबाबत अधिक माहिती देणं शक्य होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. या स्फोटात नेमके कुठले पदार्थ वापरले गेले आणि यामागे नेमका कुणाचा हात आहे, याचा तपास सुरू असून लवकरच माध्यमांना याची माहिती दिली जाईल, अशी घोषणा पोलिसांनी केली आहे.