बीड : राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.याच दरम्यान बीड जिल्ह्यातून धक्कादायक निकाल हाती आले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.मंत्री धनंजय मुंडे यांना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जोर का झटका दिला आहे.यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे.राज्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहिले आहे.तीनही नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक जागा जिंकून भाजप बहुमताकडे वाटचाल केलेली आहे.
निवडणुकीचा निकाल खालीलप्रमाणे
शिरूर नगरपंचायत
एकूण जागा-17
भाजपा -11
राष्ट्रवादी- 4
शिवसेना- 2.
आष्टी नगरपंचायत
एकूण जागा- 17
निकाल जाहीर-12
भाजपा- 07
अपक्ष- 02 (भाजपा पुरस्कृत)
एनसीपी- 02
अपक्ष- 01
पाटोदा नगरपंचायत
एकूण जागा-17
निकाल जाहीर-8
भाजपा-5
अपक्ष-3