
बीड : राज्यात पुन्हा एकदा कोरोणाचा विस्फोट होत असताना, मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शहरात बन्सल क्लासेसच्या चालकांनी कोरोना नियमांना खो देऊन, सत्यनारायण पूजेच्या नावाखाली चक्क एक प्रकारची शाही पार्टीच केली आहे.
यावेळी शेकडो विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देत संगीत रजनीच्या माध्यमातून देखील ही पार्टी (Party) थाटली आहे. यावेळी कोरोनाला निमंत्रण देत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ मांडल्याचं पाहायला मिळालं. बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, आज रात्रीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीला संचारबंदी लागू होत आहे.तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून लाखो हजारो रुपयांचे शुल्क वसूल करून, कोरोना (Corona) नियमांना पायदळी तुडवून परळी (parli) शहरात बन्सल क्लासेस कडून सत्य नारायण पूजेच्या (Satya Narayan Puja) नावाखाली, संगीत रंजणीच्या माध्यमातून शाही पार्टी करण्यात आली. तर यावेळी शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यामुळे या क्लासेस चालकावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जनतेतून होत आहे