Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Green Crusader Award 2026 : सच्च्या हरित योद्ध्यांचा गौरव! डॉ. पंकज शर्मांना ‘ग्रीन क्रुसेडर’ पुरस्कार; पर्यावरण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान.

महाराष्ट्राचे राज्यपाल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६’ पुरस्कारांचे वितरण, पर्यावरण संरक्षणाच्या समान ध्येयाने एकत्र आलेल्या २२ मान्यवरांचा गौरव

पुणे : विकास आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणे आवश्यक असून आर्थिक प्रगती आणि निसर्ग संरक्षण यांच्यात समतोल साधला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. रविवारी (३१ ऑगस्ट) पुण्यातील द रिट्झ-कार्लटन येथे आयोजित शानदार कार्यक्रमात’ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६ : पुणे चॅप्टर’चे वितरण झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

हा कार्यक्रम नाला सुशोभीकरण अभियानाला पाठबळ देणाऱ्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून ‘द भामला फाउंडेशन’चे संस्थापक आणि अध्यक्ष आसिफ भामला तसेच ‘पंचशील रिअॅल्टी’चे संस्थापक आणि अध्यक्ष अतुल चोरडिया यांच्या वतीनेक संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ या सोहळ्याचे माध्यम भागीदार होते.

“भारताची सांस्कृतिक मूल्ये आणि परंपरांशी विकासाची सांगड घातली पाहिजे. निसर्गाचा गैरवापर न करता त्याचा जबाबदारीने वापर करण्याची शिकवण भारतीय जीवनपद्धतीतून मिळते,” असे राज्यपाल वर्मा यांनी यावेळी सांगितले. विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधला तरच शाश्वत प्रगती साध्य होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला.

फ्लॅश फ्लड, ढगफुटी आणि दुष्काळाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत राज्यपालांनी निसर्गाचे अनियंत्रित शोषण हे मानवी समुदाय तसेच मानवी जीवनासाठी गंभीर धोका असल्याचे सांगितले. वनसंपदा, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण ही देशाची सामूहिक जबाबदारी आणि राष्ट्रीय प्राधान्य राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यात ‘सीविक मिरर,’ ‘पुणे टाइम्स मिरर’ तसेच लेक्सिकॉन ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डाॅ. पंकज शर्मा यांचा ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६ : पुणे चॅप्टर’ देऊन गौरव करण्यात आला. ‘ग्रीन स्कूल’ला प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हरित शाळा उभारणे म्हणजे केवळ झाडे लावणे किंवा ऊर्जेची बचत करणे नव्हे, तर पृथ्वीप्रती आपली जबाबदारी समजून घेणाऱ्या पिढीची जडणघडण करणे होय. शाश्वततेची ही संकल्पना मुलांच्या दैनंदिन शिक्षणाचा, विचारांचा आणि वर्तनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, यावर लेक्सिकॉनचा विश्वास आहे. लहानपणीच मुलांना पर्यावरणाची काळजी घेण्याची शिकवण मिळाली तर उद्याच्या काळात तीच मुले आपल्या या सुंदर ग्रहाचे संरक्षण करणारे जबाबदार नागरिक बनतील. हा सन्मान म्हणजे वैयक्तिक गौरव नसून पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत भविष्य घडवण्याच्या सामूहिक जबाबदारीची घेण्यात आलेली दखल आहे.
– डाॅ. पंकज शर्मा, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, ‘सीविक मिरर,’ ‘पुणे टाइम्स मिरर’ तसेच लेक्सिकॉन ग्रुप

पर्यावरणपूरक ग्रीन स्कूलची निर्मिती केल्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘ग्रीन क्रुसेडर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘सीविक मिरर,’ ‘पुणे टाइम्स मिरर’ तसेच लेक्सिकॉन ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डाॅ. पंकज शर्मा यांची भावना

पर्यावरणीय शाश्वतता ही संकल्पना मुलांच्या दैनंदिन शिक्षणाचा, विचारांचा आणि वर्तनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. लहानपणीच मुलांना पर्यावरणाची काळजी घेण्याची शिकवण मिळाली तर उद्याच्या काळात तीच मुले आपल्या ग्रहाचे संरक्षण करणारे जबाबदार नागरिक बनतील. पर्यावरणीय शाश्वतता ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, अशी भावना पर्यावरणपूरक ग्रीन स्कूलची निर्मिती केल्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘ग्रीन क्रुसेडर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘सीविक मिरर,’ ‘पुणे टाइम्स मिरर’ तसेच लेक्सिकॉन ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डाॅ. पंकज शर्मा यांनी व्यक्त केली.

‘द भामला फाउंडेशन’चे संस्थापक आणि अध्यक्ष आसिफ भामला तसेच ‘पंचशील रिअॅल्टी’चे संस्थापक आणि अध्यक्ष अतुल चोरडिया यांच्या वतीने नाला सुशोभीकरण अभियानाला पाठबळ देण्यासाठी हा कार्यक्रम रविवारी (३१ ऑगस्ट) पुण्यातील द रिट्झ-कार्लटन येथे आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण, नागरी विकास आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि पशुसंवर्धन तसेच दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय पर्यावरणपूरक आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे राजकीय नेते, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ सनदी अधिकारी, उद्योजक आणि परिवर्तनाचे शिल्पकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.’सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ या सोहळ्याचे माध्यम भागीदार होते.

या पुरस्कारामुळे अधिक नागरिकांना प्रेरणा मिळेल : डॉ. पंकज शर्मा

हरित भविष्याची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी आहे. त्याची सुरुवात युवा पिढीला पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे महत्त्व समजावून देण्यापासून तसेच शाश्वत जीवनशैली स्वीकारण्यास प्रवृत्त करण्यापासून होते. द लेक्सिकॉन स्कूलने आपल्या कार्याची उभारणी याच विचारसरणीभोवती केली आहे. हरित शाळा उभारणे म्हणजे केवळ झाडे लावणे किंवा ऊर्जेची बचत करणे नव्हे; तर पृथ्वीप्रती असलेली आपली जबाबदारी समजणारी पिढी घडवणे होय,” असे डॉ. पंकज शर्मा यांनी ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड’ स्वीकारल्यानंतर सांगितले.

“लेक्सिकॉनमध्ये शाश्वतता ही मुलांच्या दैनंदिन शिक्षणाचा, विचारांचा आणि वर्तनाचा भाग बनली पाहिजे, असा आमचा विश्वास आहे. आज मुले पर्यावरणाची काळजी घेण्यास शिकली, तर उद्या ती आपल्या ग्रहाचे संरक्षण करणारे जबाबदार नागरिक बनतील,” असे डॉ. शर्मा यांनी सांगितले. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. शर्मा म्हणाले की, हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत भविष्य घडविण्याच्या सामूहिक जबाबदारीची दखल आहे. पर्यावरणीय शाश्वतता ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. वाढत्या पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यक्ती, संस्था, उद्योग आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, व्यापक लोकसहभागाला प्रेरणा देणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांचे सातत्यपूर्ण लोकचळवळीत रूपांतर करणे यामध्ये अशा पुरस्कारांची महत्त्वाची भूमिका असते. या पुरस्कारामुळे अधिकाधिक नागरिकांना, विशेषतः युवा पिढीला, निसर्गाच्या संरक्षणासाठी अर्थपूर्ण पावले उचलण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा डॉ. शर्मा यांनी व्यक्त केली. पर्यावरणविषयक जनजागृती, जबाबदार विकास आणि अधिक हिरवेगार, निरोगी आणि शाश्वत पुणे घडविणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याची आपली बांधिलकी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

विकास आणि पर्यावरण संवर्धनात समतोल साधण्याचे राज्यपालांचे आवाहन

पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून, भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण सुनिश्चित करणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. विकास आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात समतोल साधण्याचे आवाहन करत राज्यपाल वर्मा यांनी आर्थिक प्रगतीसोबत निसर्गाच्या संरक्षणाची सांगड घातल्याशिवाय शाश्वत विकास शक्य होणार नाही, असे स्पष्ट केले.

पर्यावरण ही मानवतेकडे सोपविण्यात आलेली अमूल्य ठेव आहे. ज्याप्रमाणे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन केला जातो, त्याचप्रमाणे पर्यावरणाचेही संरक्षण झाले पाहिजे. भारताच्या सांस्कृतिक मूल्ये आणि परंपरांशी विकासाची सांगड घातली पाहिजे. निसर्गाचा गैरवापर न करता त्याचा जबाबदारीने वापर करण्याची शिकवण भारतीय जीवनपद्धतीतून मिळते,” असे राज्यपाल म्हणाले.

ईशान्य भारतातील समृद्ध जैवविविधतेचा उल्लेख करताना त्यांनी मेघालयातील पवित्र वनक्षेत्रे आणि नागालँडमधील पवित्र जंगले यांचे उदाहरण दिले. समुदाय आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादी आणि परस्परावलंबी नाते या माध्यमातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. ‘अतिथी देवो भव’ या संकल्पनेप्रमाणेच ‘प्रकृती देवो भव’ ही भावना स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

नेपाळमधील घटनेबाबत राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

जगभरात फ्लॅश फ्लड, ढगफुटी आणि दुष्काळ यांसारख्या तीव्र हवामान घटनांची वारंवारता वाढत असल्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. “नेपाळ आणि जगातील इतर भागांमध्ये अलीकडे झालेल्या नैसर्गिक आपत्ती या निसर्गाच्या अनियंत्रित शोषणाच्या परिणामांची आठवण करून देतात. निसर्ग जेव्हा प्रत्युत्तर देतो, तेव्हा तो शक्तिशाली आणि दुर्बल असा भेद करत नाही. त्यामुळे वनसंपदा, जैवविविधता आणि व्यापक पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजे मानवी जीवन आणि समुदायांचे संरक्षण करणे होय,” असे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी पर्यावरणपूरक आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी तसेच शाश्वततेला महत्त्व देणारी संस्कृती निर्माण करावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली. नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे ही भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. निसर्गाचे रक्षण करणे आणि भावी पिढ्यांसाठी अधिक चांगला पर्यावरणीय वारसा निर्माण करणे हे देशाचे सामूहिक प्राधान्य राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

केवळ संकल्प नव्हे, कृतीचा गौरव

ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६ : पुणे चॅप्टर हा केवळ पुरस्कार सोहळा न राहता पर्यावरणीय जबाबदारीचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणाऱ्या कल्पना, उपक्रम आणि व्यक्तींचा गौरव करणारे व्यासपीठ ठरले. नेतृत्व, नवकल्पना, लोकसहभाग आणि शाश्वततेची बांधिलकी एकत्र आली तर अर्थपूर्ण बदल घडवून आणणे शक्य आहे, हा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

प्रास्ताविकात आसिफ भामला यांनी पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृती वाढविण्यासाठी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली. पर्यावरणाचे संरक्षण केवळ संस्थात्मक प्रयत्नांमधून शक्य होणार नाही; त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सामूहिक योगदान आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सक्रिय भागीदार म्हणून सहभागी व्हावे, यासाठी फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील राहील, असे भामला यांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धनाची चळवळ केवळ स्वतंत्र मोहिमांपुरती मर्यादित न राहता व्यापक लोकसहभागाच्या माध्यमातून ती अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

२२ हरित योद्धयांचा सन्मान

‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६ : पुणे चॅप्टर’मध्ये पर्यावरण आणि समाजासाठी अर्थपूर्ण व मोजता येण्याजोगा बदल घडवून आणण्यासाठी दृष्टी, बांधिलकी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, नागरी परिवर्तन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल एकूण २२ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

‘सीविक मिरर,’ ‘पुणे टाइम्स मिरर’ तसेच लेक्सिकॉन ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पंकज शर्मा यांचा हरित शाळांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांसाठी गौरव करण्यात आला.

देवेन वर्मा यांना वाघोलीतील नाला पार्कसाठी केलेल्या कार्याबद्दल, तर बेक जॉन यांना जागतिक दर्जाचे जैन संग्रहालय उभारण्याच्या संकल्पनेसाठी गौरविण्यात आले.

डॉ. एलहम तहमासेब मिर्झा यांना वनीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उपक्रमांतर्गत दर रविवारी १२ हजार झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जात आहे.

पुणे अधिक स्वच्छ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अदर पूनावाला यांचा, तर गणेश बिडकर यांचा नदी विकास प्रकल्पातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्यास मदत करणाऱ्या सायकलिंग शर्यतीच्या आयोजनासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. शहरातील नदी विकासाच्या उपक्रमांतील योगदानाबद्दल पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान करण्यात आला.

मनोरंजन, उद्योग आणि सार्वजनिक जीवनातील अनेक नामवंत ‘ग्रीन क्रुसेडर्स’चीही या सोहळ्यात उपस्थिती होती. यामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, कनिका कपूर, बोमन इराणी, पवनदीप राजन, शंतनू मुखर्जी (शान), करण कुंद्रा, नादिर गोदरेज, शेखर सुमन, राकेश बेदी आणि सुजय जयराज ठाकरे यांचा समावेश होता. याशिवाय राहुल बोस, सचिन जोशी, आयपीएस यशस्वी यादव आणि अभिजित लोढा यांचाही सामाजिक विकास, सार्वजनिक सेवा आणि समुदाय कल्याणातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *