Navgan News



Add Space

क्राईमताज्या बातम्यानवगण विश्लेषण

प्रायव्हेट पार्ट विकून 1.20 कोटी कमावण्याचं स्वप्न! तरुणाशी मैत्री केली, निर्जन ठिकाणी नेऊन संपवलं अन् नंतर…

Crime News : तब्बल 1.20 कोटी मिळवण्याच्या लालसेत 17 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भोपाळमध्ये समोर आला आहे. या प्रकरणात 3 अल्पवयीन मुलांसह 5 जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

मृत तरुणाची ओळख त्याच्या हातावरील टॅटूमुळे पटली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुमारे महिनाभर आधी या तरुणाशी मैत्री केली होती. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी दोन अल्पवयीन आरोपी त्याला मैदानाजवळ भेटले. काही मुलांशी वाद झाल्याचे सांगत त्यांनी त्याला सोबत येण्यास सांगितले. त्याबदल्यात 100 रुपये देण्याचे आमिषही दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून तरुण त्यांच्यासोबत गेला.

त्यानंतर आरोपी त्याला गिन्नौरी आणि किलोल पार्कमार्गे छोटा तलाव परिसरातील धोबी घाटाजवळ घेऊन गेले. या संपूर्ण प्रकारात झोहेब खान नावाचा आरोपी मोबाईलवरून त्यांच्या संपर्कात होता. निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर तिघांनी तरुणावर चाकूने हल्ला केला. गंभीर वारांमुळे त्याचा मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपींनी झोहेबला व्हिडीओ कॉल करून पुढे काय करायचे, याबाबत सूचना घेतल्याचे तपासात समोर आले आहे. झोहेब हा BBAचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या चौकशीत या कटामागील कथित कारणही समोर आले. झोहेबने Instagramवर एक व्हिडीओ पाहिला होता. त्यामध्ये एका व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन त्याच्या शरीरातील अवयव काढून ते विकल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातून मोठी रक्कम मिळू शकते, असा आरोपींचा समज झाला आणि त्यातून हा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

श्यामला हिल्स पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू आणि मृत तरुणाचा मोबाईल जप्त केला आहे. 10 ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह सापडला. सुरुवातीला ओळख पटत नव्हती. अखेर 15 ऑगस्ट रोजी आईने हातावरील टॅटूवरून मुलाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिस तपासात या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *