Navgan News

ताज्या बातम्यानवगण विश्लेषणशेत-शिवार

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं. Video Viral


बिबट्या पाण्याने भरलेल्या विहरीत पडल्याने गावकऱ्यांनी स्वतःहून बचाव मोहीम सुरू केली.
बांबूच्या काठीच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न करताना काठी कोसळली आणि तब्बल आठ जण विहरीत पडले.
हा अनपेक्षित प्रकार पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

बिबट्याचा गावामध्ये सुळसुळाट वाढला असून अलीकडे यासंदर्भात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक बिबट्या विहरीत पडून आपल्या बचावासाठी संघर्ष करताना दिसतो. बिबट्याला असं विहरीत पडल्याचं पाहून काही गावकरी त्याला वाचवण्यासाठी बचाव मोहीम हातात घेतात. ते एका काठीच्या साहाय्याने त्याला वाचवण्याचा प्लॅन आखतात पण पुढे काहीतरी अजबच घडून बसते. बचावकर्ते स्वतःच धोक्यात येतात आणि क्षणात घटना रंजक वळण घेते. चला व्हिडिओमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

 

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक बिबटा चुकून पाण्याने भरलेल्या विहिरीत पडतो. गावकरी बिबट्याला वाचवण्यासाठी विहिरीभोवती जमतात आणि स्वतःच्या जीवाच्या भीतीने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करतात. तथापि, हे बचाव कार्य असे वळण घेते ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल. बिबट्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते एका बांबूची मदत घेतात. विहिरीवर या बांबूला ठेवून बिबट्याने त्या बांबूला पकडावे मग ते त्याला खेचून बाहेर काढतील असा प्लॅन करतात. पण घडत काही भलतंच… बिबट्या काठीवर चढताच, त्याच्या वजनाने काठी खाली पडते आणि काठीसह वाचवायला आलेली लोकही विहरीत पडतात. पडणाऱ्या लोकांची संख्या फक्त एक-दोन नाही तर तब्बल आठ असते. पाण्यात पडताच ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात धडपडताना दिसतात. त्यांची ही अवस्था अनेकांना हसू अनावर करते. घटनेत पुढे काय घडलं याची मात्र कोणतेही माहिती व्हिडिओत देण्यात आलेली नाही. काहीजण व्हिडिओ एआय निर्मित असल्याचाही दावा करत आहेत.

 

व्हिडिओ @echoesofmemes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिबट्या म्हणाला असेल मी डुबणार तर सर्वांना घेऊन डुबणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बचावकर्त्यांनाच बचावाची गरज आहे”.

 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *