मुलीच्या शाही साखरपुड्याची जोरदार चर्चा; होणाऱ्या टीकेवर इंदुरीकर महाराज यांची पहिली प्रतिक्रिया…

महाराष्ट्राला प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांना हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते.
महाराष्ट्राला परिचयाचे असणारे नाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले असून, कीर्तनामध्ये लग्नाचा खर्च टाळा असे आवाहन करणारे इंदुरीकर महाराज त्यांच्या मुलीच्या साखरपुडा सोहळ्याला लाखोंच्या खर्च केल्याने टीकेचे धनी बनले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतःत इंदुरीकर महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉन्समध्ये मोठ्या थाट्यात पार पडला. या सोहळ्याला राजकीय नेत्यांनी देखील हजरी लावली होती. मात्र शाही सोहळ्यातील खर्चावरून इंदुरीकर महाराजांवर मोठी टीका होत आहे.
लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्या पद्धतीने करा, असे आवाहन इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून करतात. पण स्वतः मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला असल्याचा आरोप डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केली आहे.
या सगळ्या आरोपांवर इंदुरीकर महाराज यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी त्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
“मला काही लोकांची तक्रार आली की, मी साध्या पद्धतीने लग्न करा, असे सांगतो आणि मुलीचा साखरपुडा थाटात केला. हा साखरपुडा त्यांना दाखवण्यासाठी केला. आपण बदल करू शकतो, बदल करण्याची आपली ताकद आहे. कार्यक्रमात कोणाचाही सत्कार केला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
…पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज
तर दुष्काळग्रस्तांना 1,11,101 रुपयांची मदत केली. जेवण साधे आणि महाराष्ट्रीयन होते, चायनीज जेवण नव्हते. वाढणाऱ्यांचा ड्रेस वारकरी वेशातील होता, असे स्पष्टीकरण देत इंदुरीकर महाराज यांनी होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून टाकला आहे. तुम्हाला नाव ठेवायचं तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.






