घरोघरी गोकर्णाचा वेल असायलाच हवा, कारण…. बघा गोकर्णाच्या फुलांचे ४ आरोग्यदायी फायदे…

पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी गोकर्णाचा वेल वाढायला लागतो. हा वेल असा असतो की त्याची बी जरी मातीमध्ये पडली तरी लगेच तो फुलून येतो आणि पाहता पाहता अगदी भराभर मोठा होतो. गोकर्णाच्या वेलाचं एक वैशिष्ट्य असं की त्याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज नसते.
फारशी काळजी न घेताही तो चांगला वाढतो आणि त्याला फुलंही येतात. गोकर्णाला पांढऱ्या आणि निळ्या रंगाची फुलं येतात. त्यापैकी निळी फुलं अतिशय मोहक असतात. या फुलांमध्ये खूप जास्त औषधी गूण आहेत (how to make gokarna flower tea?). त्यामुळे ती वेगवेगळ्या शारिरीक तक्रारी कमी करण्यासाठी मदत करतात. शिवाय सौंदर्य खुलविण्यासाठीही उपयुक्त ठरतात.(health benefits of aparajita or gokarn flower kadha)
गोकर्णाच्या फुलांचे आरोग्यदायी फायदे
१. संधीवाताचा त्रास कमी करण्यासाठी गोकर्णाचा काढा पिणे उपयुक्त ठरते. हिवाळ्याच्या दिवसांत संधीवाताचं दुखणं वाढतं. त्यामुळे या दिवसांत हा काढा पिणं फायदेशीर ठरेल.
२. नजर तेज होण्यासाठी गोकर्णाचा काढा पिणं उपयुक्त ठरतं.
३. त्वचेच्या कित्येक तक्रारी कमी करून त्वचा चमकदार, नितळ, स्वच्छ करण्यासाठी गोकर्णाचा काढा उपयुक्त ठरतो.
४. खूप टेन्शन आलं असेल, मनावरचा ताण वाढला असेल तर गोकर्णाचा काढा प्या.
५. पचनक्रिया चांगली होऊन बॉडी डिटॉक्स करण्यासाठीही गोकर्णाचा चहा पिणं उपयुक्त ठरतं.
गोकर्णाचा चहा किंवा काढा कसा तयार करावा?
यासाठी गोकर्णाची फुलं स्वच्छ धुवून घ्या. सुकलेली फुलं घेतली तरी चालतील. ती फुलंही मात्र स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका पातेल्यामध्ये दिड कप पाणी उकळायला ठेवा.
त्या पाण्यामध्ये गोकर्णाची ५ ते ६ फुलं घालून पाणी ५ ते ७ मिनिटे चांगले खळखळून उकळू द्या.
यानंतर काही वेळ ते पाणी झाकून ठेवा. पाणी जेव्हा कोमट होईल तेव्हा ते गाळून घ्या आणि कोमट असतानाचा ते पिऊन घ्या.
गोकर्णाच्या फुलांचा काढा करण्याची एक दुसरी पद्धतही आहे. त्यासाठी ही फुलं काही वेळ गरम पाण्यात भिजत ठेवून नंतर ते पाणी गाळून घ्यावं. दोन्हीपैकी जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही काढा करून पिऊ शकता. पण त्यापुर्वी तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला मात्र जरुर घ्यावा.
9000+ मॅगझीन्स एक्स्प्लोर करा






