Navgan News

आंतरराष्ट्रीयक्राईमराजकीय

पंतप्रधानाकडूनच माझ्यावर वारंवार रेप, बेशुद्ध होईपर्यंत. जेफ्री एपस्टीनच्या सर्व्हायवरच्या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासा…

जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडलमधून वाचलेल्या मुख्य व्यक्तींपैकी एक असलेल्या व्हर्जिनिया जीफ्रेच्या कथेवर आधारित पुस्तकाने अमेरिका आणि युरोपमध्ये वादळ निर्माण केले आहे. व्हर्जिनिया जीफ्रेच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले ‘नोबडीज गर्ल’ (Nobody’s Girl) या पुस्तकामध्ये जेफ्री एपस्टीन आणि त्याच्या सेक्स सिंडिकेटच्या कारनाम्यांचा इतिहास विस्तृतपणे सांगण्यात आला आहे.

तिच्यावर एका “सुप्रसिद्ध पंतप्रधानांनी” बलात्कार केला होता, असा धक्कादायक दावा या पुस्तकात व्हर्जिनिया जीफ्रेन असा केला आहे.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियात तिचा मृत्यू झाल्यानंतर 6 महिन्यांनी हे पुस्तक प्रकाशित झालं. या आत्मचरित्रात जगभरातील शक्तिशाली पुरुषांकडून वर्षानुवर्षे झालेल्या लैंगिक शोषण, जबरदस्ती आणि तस्करीचा थेट उल्लेख आहे.

या पुस्तकात जीफ्रेने अनेक खुलासे केले. एपस्टाईनच्या कैदेत तिची तस्करी कशी झाली आणि नंतर त्याच्या अनेक प्रभावशाली सहकाऱ्यांनी तिचे लैंगिक शोषण कसे केले हे तिने सांगितलं आहे. मात्र, या पुस्तकातील सर्वात धक्कादायक दावा हा एका अनामिक “सुप्रसिद्ध पंतप्रधाना” बद्दल आहे. या अनामिक पंतप्रधानांनी क्रूरपणे मारहाण आणि बलात्कार केला असा आरोप व्हर्जिनियाने केला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या मृत्यूपूर्वी जीफ्रे ही, पुरस्कार विजेत्या पत्रकार आणि लेखिका एमी वॉलेससोबत “नोबडीज गर्ल: अ मेमोयर ऑफ सर्व्हायव्हिंग अ‍ॅब्युज अँड फाइटिंग फॉर जस्टिस” नावाच्या एका पुस्तकावर काम करत होती. असोसिएटेड प्रेसनुसार, 400 पानांचं हे पुस्तक 21 ऑक्टोबर रोजी बाजारात आलं. अत्याचाराच्या या कथित घटनेची जीफ्रेने अगदी सविस्तर माहिती दिली. तिचा कसा वापर झाला आणि अपमान कसा करण्यात आला, ती कधी गुदमरली, कशी मारहाण झाली याचं अगदी अंगावर येणार वर्णन तिने केलं.

तो आणखी उत्तेजित झाले..

जीफ्रेच्या सांगण्यानुसार ती 18 वर्षांची असताना एपस्टीन खासगी बेटावर हा प्रकार घडला. ” मी बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी वारंवार माझा गळा दाबला आणि जीव वाचवण्यासाठी माझी जी घाबरगुंडी उडाली ते पाहून ते खुश झाले. पंतप्रधानांनी मला दुखावले तेव्हा ते हसले आणि मी त्यांना थांबण्याची विनंती केली तेव्हा ते आणखी उत्तेजित झाले .” असा दावा तिने पुस्तकात केला.

परत मला कोणत्याही राजकारण्याक़डे पाठवू नको अशी विनंती मी एपस्टाईनकडे केली. पण त्याने माझी विनंती धु़कावून लावली आणि म्हणाला, कधी ना कधी तुला हे झेलावेच लागेल, असा दावाही जीफ्रेने केला.

कोण होता जेफ्री एपस्टीन , काय होतं कांड ?

जेफ्री एपस्टीन (1953-2019) हा एक श्रीमंत अमेरिकन व्यापारी होता जो बाल लैंगिक शोषण आणि लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरला होता. त्याच्याकडे न्यू यॉर्क आणि फ्लोरिडामध्ये मालमत्ता होती. तसेच त्याने बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्या उच्च-प्रोफाइल व्यक्तींशी संबंध प्रस्थापित केले. 2008 साली त्याला फ्लोरिडामध्ये मुलांसोबत बेकायदेशीर लैंगिक क्रिया केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि त्याने 13 महिने तुरुंगवास भोगला. तर 2019 मध्ये त्याला यौन तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, जेलमध्ये नेत असतानाच त्याने आत्महत्या केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *