Navgan News

आंतरराष्ट्रीय

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकवर डागणार क्षेपणास्त्र …


रविवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केला. पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला केला आहे.

त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. हा हवाई हल्ला तहरीक ए तालिबानविरुद्ध करण्यात आला होता. आता या हल्ल्याला अफगाणिस्तानकसे प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे. या हल्ल्यामुळे चीन देखील सतर्क झाला आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला केला आहे. यामुळे तणाव वाढला आहे. पाकिस्तान देखील सतर्क झाला आहे. पाकिस्तानने हवाई हल्ला करत काबूलच्या ८ जिल्ह्यांमध्ये भीषण बॉम्बवर्षाव केला. पाकिस्तानची लढाऊ विमाने काबूलमध्ये शिरल्याचे म्हटले जात आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बरमल जिल्ह्यातील मर्गा बाजारावर बॉम्ब वर्षाव केले. यामध्ये बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले.

चीनने जारी केला अलर्ट

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केली. यानंतर चीन सतर्क झाला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अफघानिस्तान पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता आहे. चीनने आपल्या नागरिकांसाठी निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानमद्ये असणाऱ्या चीन दूतावास, चीन-पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या विकासकामांवर हल्ला होण्याची शक्यता वाढली आहे.

अण्वस्त्रांच्या शर्यतीत चीनची मोठी झेप

चीन अणुऊर्जेच्या शर्यतीत मोठी झेप घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भत एक अहवालही समोर आला आहे. संपूर्ण जग हवामान बदल आणि जागतिक मंदीशी झुंजत असताना, चीन शांतपणे आपले अणुबॉम्ब मजबूत करत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अलीकडील अहवालानुसार, चीनचा अणुबॉम्ब साठा आता वेगाने वाढत आहे.

SIPRI च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये चीनकडे ४१० अणुबॉम्ब होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ५०० वर पोहोचली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, फक्त एका वर्षात चीनकडे जवळजवळ १०० नवीन अणुबॉम्बची भर पडली आहे आणि ही वाढ वेगाने होत आहे. २०२५ च्या प्राथमिक आकडेवारीवरून हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

भारताने रणनीती तयार करावी

याचा परिणाम केवळ आशियाच नाही तर संपूर्ण जगाच्या धोरणात्मक संतुलनावर होऊ शकतो. अमेरिका, रशिया, भारत आणि यांसारखे इतर अणुबॉम्ब असणारे आत देश आता चीनच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतासाठी हा इशारा मानला जात आहे. भारताला सुरक्षा आणि अणुधोरणाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. चीनने “प्रथम वापर नाही” या आपल्या धोरणाचा जाहीरपणे पुनरुच्चार केला असला तरी, त्याच्या वेगाने वाढणाऱ्या अणुऊर्जेमुळे हे धोरण प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *