
लेह-लडाखमध्ये आज तरुणाईचा भडका उडाला. युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या गाड्या पेटवण्यात आल्या. दगडफेकही करण्यात आली. तसेच भाजपच्या कार्यालयावर हल्ला करत ते पटवून देण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर अतिरिक्त पोलीस दलाला तैनात करण्यात आले.
लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि संविधानिक अधिकार बहाल करावे, या मागणीसाठी तरुणांचे आंदोलन सुरू आहे. आज लडाख बंदची घोषणाही करण्यात आली होती. केंद्र सरकारने येत्या ६ ऑक्टोबर रोजी लडाखमधील प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी बैठक बोलावली आहे. पण त्याआधीच लडाखमध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.
व्हिडिओ येथे पहा !
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे मागील काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मागील १५ दिवसांपासून लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची व्यापी आता वाढू लागली आहे. वांगचुंक यांच्यासोबत तरूण, महिलाही आंदोलनाला बसल्या आहेत.
दोन महिला आंदोलकांना रुग्णालयात भरती केल्यानंतर इतर आंदोलकांमध्ये रोष वाढत गेला. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सरकार कार्यालयांनाही निशाणा करण्यात आला. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्या. जवळ असलेल्या भाजपच्या कार्यालयालाही आग लावण्यात आली.
पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाडीमारही करण्यात आला. पण आंदोलन अधिकच चिघळत गेले. अखेर पोलिसांनी अतिरिक्त पोलिस दलाला पाचारण करावे लागले. त्यानंतर हे आंदोलन पोलिसांच्या आवाक्यात आले. सध्या येथील स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तरुणाईच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले, पोलिसांच्या गाड्या व भाजप कार्यालय पेटवले.
मुख्य मागणी: लडाखला राज्याचा दर्जा व संविधानिक अधिकार द्यावेत, यासाठी आंदोलन सुरू असून 6 ऑक्टोबरला केंद्र सरकारसोबत बैठक नियोजित आहे.
स्थिती नियंत्रणात: दगडफेक, आगजनीनंतर अतिरिक्त पोलिस दल तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.