Navgan News

क्राईम

“ही कुणाची चप्पल घातलीस?” आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !


चंद्रपूर : गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन एका १९ वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना २१ सप्टेंबर रोजी सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.

 

याप्रकरणी पाथरी पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह दोघांना अटक केली आहे. तुलाराम तानाजी मडावी (२२), विक्की विनोद कोवे (२१) या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी गेली आहे, तर दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री ९:०० च्या सुमारास पाथरी गावातील चार जणांनी पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून गावाबाहेर असलेल्या शाळेच्या परिसरात नेले. तेथील शौचालयात तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला गावात नेऊन सोडून दिले.

ही बाब घटनेच्या चार दिवसानंतर म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली. तिने लगेच पाथरी पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरूद्ध तक्रार दिली. ठाणेदार नितेश डोर्लीकर यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

चपलेवरून घटना उघडकीस

पीडित मुलीच्या आईने मुलीला नवी चप्पल खरेदी करून दिली होती. मात्र, दोन दिवसांपासून तिच्या पायात दुसरीच चप्पल दिसून आली. त्यामुळे तिच्या आईने पीडितेला चप्पलबाबत विचारणा केली. मुलीने त्या चार मुलांनी केलेल्या कृत्याबाबत माहिती दिली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने लगेच पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *