Navgan News

आंतरराष्ट्रीय

नेपाळमधला हिंसाचार रोखण्यासाठी भारताचा मोठा निर्णय? मोदींचे संकेत? म्हणाले….


भारताचा शेजारच्या नेपाळमधील सरकार कोसळलं आहे. सोशल मीडियावरील बंदी आणि त्यामधून भ्रष्टाचाराविरोधात येथील तरुणाई रस्त्यावर उतरल्याने मोठ्याप्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भारत सरकारला नेपाळबरोबर मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. नेपाळला आता चीन अधिक जवळचा वाटू लागल्याचा उल्लेख ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. “भारतात मोठ्या प्रमाणात नेपाळची जनता रोजगार कमवीत आहे, पण नेपाळवर पूर्ण नियंत्रण आहे ते चीनचे. नेपाळची अर्थव्यवस्था चीनच्या मदतीवर अवलंबून आहे. एकेकाळी नेपाळ, भूतानसारखी राष्ट्रे भारताचे विश्वासू मित्र होती. नेपाळात नवे सरकार आले की, तेथील पंतप्रधान सगळ्यात आधी भारत भेटीवर येत. आज नेपाळचे पंतप्रधान आधी चीन दौऱ्यावर व नंतर पाकिस्तानात जातात. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. शेकडो चिनी शिक्षक सध्या नेपाळात आहेत व नेपाळची जनता त्यांच्याकडून चिनी भाषेचे धडे घेत आहे. नेपाळचा रंग आधी भगवा होता. तो आता पूर्णपणे लालभडक झाला व भारत सरकार हा बदल रोखू शकले नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

FAQ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी रात्री एक विशेष बैठक बोलावली होती.

या बैठकीत कोणत्या समितीने भाग घेतला?
या बैठकीत सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (Cabinet Committee on Security) भाग घेतला होता.

पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील परिस्थितीबाबत काय म्हटलं आहे?
पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील हिंसाचाराला “हृदयद्रावक” असं संबोधलं आहे. त्यांनी अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं नमूद केलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *