बीडमधल्या सरपंचाची निर्घृण हत्या, डोळे काढले, हत्येमागे पुणे कनेक्शन, बजरंगबाप्पांचा दावा
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे जुन्या वादातून अपहरण करून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत मस्साजोग गाव गाठलं आहे.
तर, दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आरोपींचे पुणे कनेक्शन असल्याचा शंका बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केली आहे.
खासदार बजरंग सोनावणे म्हणाले, बीड जिल्ह्यात घडलेले प्रकार गंभीर आहे. मी घडलेल्या घटनेचा निषेध करतो. बीडचा बिहार होतोय. मस्साजोगच्या सरपंचाचे अपहरण करून डोळे काढून मारल आहे. आरोपीला अटक झाली पाहिजे. या आरोपींवर खंडणी मागितली म्हणून दोन दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता पण त्यांना लगेच जामीन मिळाला. काल दुपारी 4 वाजल्यापासून SP यांनी माझा फोन उचलला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे… रात्री त्यांनी उशिरा फोन उचलला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
बीडमध्यो दोन आरोपीला अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपीला पोलिसांनी पळवून लावयच आहे का? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील गुंड आमच्याकडे दहशत पसरवत आहे. त्यांचं पुणे लाईन कनेक्शन आहे अस समजत आहे. 27 तास होऊन देखील पोलीस काहीही करत नाही. पोलिसांच्या समोर आरोपी पळून गेले अशी माझी माहिती आहे
परळीत एका व्यापाऱ्याला उचलून नेलं. बलाढ्य नेते जिल्ह्यात आहेत मग अशा घटना जिल्ह्यात का घडत आहेत ?फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी यात लक्ष घालावं जिल्ह्याचे SP यांना तत्काळ बदलले पाहिजे. PI यांचं निलंबन केलं पाहिजे या लोकांना पोलीस यंत्रणेची साथ आहे अस वाटते, असेही सोनावणे म्हणाले.
अजित पवारांना साथ देणार असल्याच्या बातम्यांवर सोनावणे म्हणाले, माझंही नाव यात येत आहे. आम्ही 8 जण आमच्या पक्षाचे निवडून आलेलो आहोत.आमच्या मनात कधीच पक्ष बदलण्याचा विचार आला नाही. मला कोणाचाही फोन आला नाही. कोणी सिद्ध करून दाखवलं तर मी तुम्ही जी म्हणाल ती राजकीय शिक्षा भोगायला तयार आहे. अशा बातम्या का येतात हे मला माहीत नाही, अस काहीही होणार नाही. आमचा एकच पक्ष आहे. आम्ही सगळे एक आहोत.