नवगण विश्लेषण

वाईट काळ सुरू होण्याआधी घर देतं हे संकेत, वेळीच ओळखा नाहीतर..


आपल्या घरात काही वाईट घटना घडत असतात. किंवा जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील तर आपण म्हणतो की आपला वाईट काळ सुरू झाला आहे. या वाईट गोष्टी घडणं आणि त्यामध्ये सातत्य असणं हे आपल्या भविष्यासाठी मारक ठरणार असू शकतं.

सुख आणि दु:ख हे दोन्ही जीवनाचे सोबती आहेत. असं म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगली वेळ येत असली तरी त्याला वाईट प्रसंगालाही सामोरे जावे लागते. आपल्यावर आलेला वाईट काळ खूप दिवस नसतो. तो कधी ना कधी निघून जातो. पण, तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो.

 

ज्योतिष शास्त्रात काही चिन्हे सांगितली आहेत ज्यांच्या द्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार आहे हे कळू शकते. वाईट वेळ येण्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात. ज्यावरून आपल्याला लगेचच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात.

उंदीर घरात येतात (Astro Tips)

घरात जास्त अडगळ असेल तर उंदीर येणं स्वाभाविक आहे. पण, जेव्हा घरात अचानक उंदीर दिसायला लागतात. तेव्हा घरावर काही संकट येणार हे समजून जा. ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या घरात काळे उंदीर अचानक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. हे सूचित करते की भविष्यात तुमच्यावर काही मोठी संकटे येणार आहेत.

सोन्याच्या वस्तूचे नुकसान (Astro Tips For Home)

सध्या सोन्याचा भाव वाढलेला आहे, त्यामुळे सोन्याचे दागिने जपून वापरले जातात. पण घरात अचानक एखाद्या व्यक्तीचा सोन्याचा दागिना हरवतो. तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची वस्तू गमावणे शुभ मानले जात नाही. सोनं हरवलं तर घरात नकारात्मकता येऊ लागते, असा समज आहे. वास्तविक, सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तुमचे सोने हरवले तर घरात नकारात्मकता येते.

 

तूपाचा डबा सांडणे (Ominous Signs of Bad Times)

घरात महिलांकडून चुकून अनेक वस्तू सांडत असतात. किंवा घरातील पुरूषांकडूनही अनेक गोष्टी सांडतात. त्या गोष्टींचा फरक नाही पडत. मात्र, तुमच्या हातातून तुपाचा डबा पडला. आणि तूप जमिनीवर पसरले तर ते सूचित करते की तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.

पालींची भांडणं (Astro Tips In Marathi )

सर्वांच्याच घरी पाली असतात. काही समजुतीनुसार घरात पाली असणे शुभ असते. मात्र, घरात दोन पाली एकमेकींशी भांडत असतील, भिंतीवरच कुस्ती करत असतील तर ते तुमच्यासाठी नकारात्मक असू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार जर घरामध्ये पाली भांडत असेल तर ते देखील अशुभ मानले जाते. हे देखील वाईट काळ येण्याचे लक्षण आहे.

सुकलेली तुळस (Astrology Things For Bad Time)

घराच्या अंगणातील फुललेली हिरवीगार तुळस तुमच्या घराला शुद्ध करण्याचे काम करते. घरात शुद्ध वातावरण निर्माण करण्यात तुळस महत्त्वाची भुमिका पार पाडते. पण, तुमच्या अंगणातील तुळस सुकलेली असेल तर हे नकारात्मक आहे. हे तुमच्या येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *