नवगण विश्लेषण

फाटके कपडे घालून पोलीस स्टेशनला पोहोचला तरुण, नाव ऐकताच ऑफिसरना फुटला घाम! नेमक काय घडल?


अनवाणी पाय, फाटलेले कपडे घालून एक तरुण पोलीस स्टेशनला पोहोचला. पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याने जी माहिती दिली ती ऐकून तिथल्या ऑफिसरनाही घाम फुटला. माझं नाव राजू आहे, मी माझं घर विसरलोय.

आजपासून 31 वर्षांपूर्वी माझं वय 7 वर्ष होतं, तेव्हा माझं अपहरण झालं होतं. मोठ्या मुश्किलीने मी पळून आलो आहे, कृपया माझी मदत करा, असं त्याने पोलिसांना सांगितलं. या तरुणाची कहाणी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. यानंतर त्यांनी तरुणाची मदत करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आणि मीडियामध्येही बातमी छापली. काही दिवसांनंतर त्याच्या कुटुंबातले नातेवाईक आले आणि ते तरुणाला घेऊन गेले.

 

31 वर्षांनंतर हा तरुण त्याची आई आणि कुटुंबाला भेटला आहे. 31 वर्षांपूर्वी हा तरुण 7 वर्षांचा होता, तेव्हा अचानक घरातून गायब झाला होता. 27 नोव्हेंबरला तो घरी परतला. लहानपणी माझं अपहरण झालं होतं, असं त्याने सांगितलं. मुलाला 31 वर्षांनंतर पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने मुलाला कवटाळून घेतलं. मुलगा घरी परतल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे पोलीसही याप्रकरणाचा तपास करत आहेत.

 

मुलगा सापडल्यानंतर मी त्याच्या शरिरावर असलेल्या खुणा बघितल्या. डोक्यावर जखमेची खूण, छातीवर तीळ बघून तो माझाच मुलगा असल्याचं दिसत आहे. पण तो ज्या प्रकारे वागत आहे, वारंवार पळून जायचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्याची डीएनए टेस्ट केली तरच सत्य कळेल, असं आई म्हणाली आहे.

 

1993 साली अपहरण

 

1993 साली त्याचं अपहरण झालं होतं, तेव्हा मुलगा हरवल्याची लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्याला राजस्थानमध्ये नेण्यात आलं होतं आणि तिकडे माझ्या सोबत हाणामारी केली जायची, मला बांधून ठेवायचे. दिवसभर काम करून घ्यायचे. पूर्ण दिवस काम केल्यानंतर फक्त एक चपाती खायला द्यायचे, असं त्याने सांगितलं आहे. राजू 8 सप्टेंबर 1993 साली साहिबाबाद भागातून गायब झाला होता, तेव्हा त्याचं वय 7 वर्ष होतं. 31 वर्षांनी परतल्यानंतर आता त्याचं वय 38 वर्ष आहे.

 

त्या दिवशी काय झालं?

मी आणि माझी बहीण त्यादिवशी शाळेतून घरी येत होते, तेव्हा माझं अपहरण करून मला राजस्थानला नेण्यात आलं. तिकडे माझ्यासोबत हाणामारी केली जायची. मला जिकडे बंधक करण्यात आलं होतं तिकडे एक लहान मुलगी होती, तिने मला हनुमानाची उपासना करायला सांगितलं. एके दिवशी संधी बघून मी राजस्थानमधल्या एका ट्रकमध्ये बसलो आणि दिल्लीला आलो, असं राजूने सांगितलं आहे.

 

दिल्लीला पोहोचल्यावर मी पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारल्या आणि मदत मागितली, पण मला कुणीही मदत केली नाही. मी माझं घर आणि परिसर सगळं विसरलो होतो. पण 22 नोव्हेंबरला मी खोडा पोलीस स्टेशनला पोहोचलो, तिकडे मला पोलिसांनी सगळं सांगितलं, असं राजू म्हणाला आहे. खोडा पोलीस स्टेशनमधल्या कर्मचाऱ्यांनीच राजूची काळजी घेतली, त्याला कपडे, चपला आणि खायला-प्यायला दिलं.

 

राजूची कहाणी समजल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि मीडियामध्ये बातमी छापली. यानंतर राजूच्या काकांना तो अजून जिवंत असल्याचं समजलं. राजू जिवंत असल्याचं कळताच काका घरी गेले आणि त्यांनी ही माहिती कुटुंबाला सांगितली. यानंतर घरातले सगळे राजूला नेण्यासाठी पोलीस स्टेशनला आले. 31 वर्षांपासून रक्षाबंधनला राखी बांधायला कुणी नव्हतं, आता राजू आल्याची भावनिक प्रतिक्रिया बहिणीने दिली. तर मागची 31 वर्ष कशी गेली, हे मलाच माहिती आहे, पण आता मुलगा परतला आहे, असं राजूची आई म्हणाली.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *