राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे निकाल समोर आले होते. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला (Mahayuti) संमिश्र कौल मिळाल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर आता सर्वांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकसभेत मनोज जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता. आता विधानसभा निवडणुकीत समोर आलेल्या एक्झिट पोलबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया आली आहे,
मनोज जरांगे म्हणाले, मी मैदानात नाही,माझा समाज पण नाही… आम्ही मैदानात असतो तर अंदाज सांगतिले असते. या राज्यात मराठ्यांच्या मतांशिवाय कोणताच उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे अंतीम सत्य आहे. त्यामुळे मराठ्यांची जबाबदारी आहे. आता आमचा आयुष्याचा प्रश्न सुरू झाला. आता आरक्षणाचा लढाई सुरू झाली. मतदान झालं आता संपला विषय.. सरकार स्थापन झाले की तारीख जाहीर करणार… आंतरवालीत सर्वात मोठे उपोषण होणार आहे.
मराठ्यांशी दगाफटका केला तर मराठे त्याला सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
निवडणुकीत उमेदवार कोणताही निवडून आला म्हणजे तो काही मालक झाला नाही, त्याला मराठ्यांनी निवडून दिले आहे. तो तुमच्या अडचणीत उभा राहिले आता उमेदवाराने आंदोलनात उभा राहिल पाहिजे. मराठ्यांशी दगाफटका केला तर मराठे त्याला सोडणार नाही. मराठा समाज आंदोलनासाठी सक्रिय झाला आहे. समाज माझ्या ऐकण्यातला आहे. त्यामुळे मी कोणाच्या दावणीला बांधलेला नाही. निवडून आले ते बेईमान रक्ताचे होऊ नका. मराठ्यांशी गद्दारी केली तर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा पण मनोज जरांगेंनी दिला आहे.
मराठे नव्या सरकारला गुडघ्यावर टेकवणार : मनोज जरांगे
महाराष्ट्रात कोणत्याही गावात उषोषण होणार नाही. आंतरवालीत आता निर्णायक आंदोलन होणार आहे. कामे उरकून घ्या, सगळ्यांनी एकत्र बसून आता तुकडा पाडायचा आहे. सरकार कोणाचेही येऊ दे आता त्यांच्यासमोर मी चॅलेंज म्हणून उभा आहे. राजकारण महत्त्वाचे नाही आरक्षण महत्त्वाचे नाही. गुलाल उधळा नाही तर चटणी उधाळा कोणी मिरवणुकांना जाऊ नका… राजकारण डोक्यातून काढा… कोणाचेही सरकार येऊ द्या… कोणतेही सरकार असू दे मराठे सरकारला गुडघ्यावर टेकवणार , असेही मनोज जरांगे म्हणाले.