ताज्या बातम्या

अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरेल ‘हा’ चहा, फक्त एक कप प्या अन्.


थंडीला सुरुवात झाली असून हवामानातील बदलामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यातच हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे, जेणेकरून रोग आणि संक्रमणांपासून स्वत: चे संरक्षण होईल.

तसेच या ऋतूत पोषक तत्वांनी समृद्ध असलेला एक कप आल्याच्या चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात.

व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आल्यापासून बनवलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, त्यात दूध घातले नाही तर त्याचे फायदे दुप्पट होतील. अशावेळी चहा बनवल्यानंतर त्याची चव वाढवण्यासाठी त्यात पुदिना, मध किंवा लिंबाचा रस घालू शकता. आल्याचा चहा पिण्याचे मोठे फायदे कोणते आहेत ते जाणून घ्या.

वेदना कमी करते

मासिक पाळीदरम्यान होणारी वेदना अनेक महिलांना असह्य असते. अशावेळी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये आल्याच्या चहाचा समावेश करू शकता. आल्यामध्ये असलेले घटक तुमच्या मासिक पाळीच्या सुरुवातीला जळजळ कमी करण्यास आणि पेटके कमी करण्यास मदत करतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा

आल्याचा चहा सेवन केल्याने फास्ट इन्सुलिनची पातळी, हिमोग्लोबिन ए १ सी आणि ट्रायग्लिसेराइड्स कमी होतात, संभाव्यत: टाइप २ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

रोग आणि संसर्गापासून संरक्षण करते

हिवाळ्यात अनेकदा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार आणि इन्फेक्शनला लोकं सहज बळी पडतात. अशावेळी आल्याचा चहा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. यामध्ये असणारे पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि आजारांपासून बचाव करतात.

मेंदूची कार्यक्षमता सुधारते

आल्याचा चहा शरीराला निरोगी बनवण्यासोबतच तुमचा मेंदूही निरोगी बनवतो. तसेच आल्याचा चहा घेतल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करते, जे अल्झायमरसारख्या न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोगांच्या विकासात दोन प्रमुख कारक आहेत. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही सुधारते.

मोशन सिकनेस पासून आराम मिळतो

खूप कमी लोकांना माहित असेल की आल्याचा चहा मोशन सिकनेसपासून मुक्त होण्यास देखील मदत करतो. प्राचीन काळापासून आल्याचा चहाचे सेवन केल्यास तुम्हाला चक्कर येणे, मळमळ आणि घाम येणे यासारख्या मोशन सिकनेसची लक्षणे शांत करण्यास मदत करतात.

मळमळ दूर करा

जर तुम्ही गर्भवती असाल किंवा केमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया केली असेल तर आल्याचा चहाच्या सेवनाने या सगळ्यात होणारी मळमळ दूर करण्यास देखील उपयुक्त ठरेल. खरं तर आल्यामध्ये असलेले जिंजरॉल्स घटक मळमळीपासून दूर ठेवते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *