क्राईम

14 वर्षीय मुलीशी शारीरिक संबंध ठेवले, 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; हॉटेलमध्ये काय घडलं?


अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 42 वर्षीय व्यक्तीने 14 वर्षीय मुलीला हॉटेलमध्ये नेलं. तिच्यासोबत संबंध ठेवले. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील ही धक्कादायक घटना आहे. नेमकं काय घडलं, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

 

माहितीनुसार 42 वर्षांची व्यक्ती आणि 14 वर्षांची मुलगी दोघंही मूळचे गुजरातचे रहिवाशी आहेत. शनिवारी 4 च्या सुमारास मुंबईतील एका हॉटेलमध्ये त्यांनी चेक इन केलं. व्यक्तीने ही आपल मुलगी असल्याचं सांगत ती तिचं आधार कार्ड दाखवलं, ज्यावर वय 17 वर्षे होतं.

त्यानंतर 2 तासांनी म्हणजे 6 च्या सुमारास व्यक्ती बेशुद्वावस्थेत होती. हॉटेल कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. पण त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

 

व्यक्तीला 17 वर्षांची मुलगी आहे. तिच्या आधार कार्डमध्ये 14 वर्षीय मुलीचा फोटो दाखवून हे आधार कार्ड त्याने हॉटेलमध्ये दाखवलं होतं. 14 वर्षीय मुलीच्या वडिलांना पॅरालिसिस आहे, तर तिची आई गृहिणी आहे. मुलीसोबत असलेली 42 व्यक्ती या कुटुंबाला आर्थिक मदत करायची अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तपास केला असता ज्या हॉटेल रूममध्ये हे दोघं होतं, तिथं काही औषधं सापडली आहेत. तसंच मुलीच्या आईने आपल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, याचा तपास सुरू आहे.Ω


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *