ताज्या बातम्या

पीएम मोदी यांच्या प्रचार सभांचे वेळापत्रक जाहीर ; अमित ठाकरेंच्या मतदारसंघात 14 नोव्हेंबरला जंगी सभा


राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची 14 नोव्हेंबर रोजी मुंबईत सभा होणार आहे.

छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा असणार आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानात हे माहीम विधानसभेत येतं आणि याच मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुक लढत आहे. तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यामान आमदार सदा सरवणकर रिंगणात आहे.

 

चार दिवसात नरेंद्र मोदींच्या 9 सभा –

नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी नरेंद्र मोदींच्या सभा होणार आहेत.

 

नरेंद्र मोदींच्या सभेवर राहुल नार्वेकर काय म्हणाले?

नरेंद्र मोदी देशातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. त्यांची सभा मोठं आकर्षण असतं आता पोषक वातावरण युतीसाठी दिसते आहे. नरेंद्र मोदींची ही सभा मुंबईतील मतदारसंघ आणि महायुतीसाठी होत आहे, फक्त माहीम या एकाच मतदारसंघासाठी नाही, असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज ठाकरे या सभेसाठी उपस्थित राहिले तर चालेल का?, असा सवाल विचारल्यानंतर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *