जनरल नॉलेज

अंतराळात काय घडलं? 104761 किमी वेग, वाटेत जो आला त्याला धडकला, पण थोडक्यात बचावली पृथ्वी


आपल्यासूर्यमालेत लघुग्रहांचा एक पट्टा आहे,ही बाब अनेकांना माहिती असेल. हेगुरू आणि मंगळाच्या कक्षेतील मुख्य लघुग्रहांच्या पट्ट्यात स्थित आहेत.यापैकी एखाद्या लघुग्रहाने आपली दिशा बदलली तर ते पृथ्वीच्या दिशेनेयेण्याची शक्यता असते.

 

याशिवाय,अंतराळात भरकटलेले इतर काही लघुग्रह देखीलकधीही पृथ्वीच्या दिशेने येतात. अशा लघुग्रहांमुळे पृथ्वीवर संकटं येऊशकतात. नुकतीच पृथ्वी अशा एका मोठ्या संकटातून बचावली आहे. आज म्हणजेच16सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजून 15 च्या सुमारास पृथ्वीपासून 16 लाख किलोमीटरअंतरावरून’2024 RN16’नावाचा लघुग्रह गेला आहे. चंद्र आणि पृथ्वीदरम्यानच्या अंतरापेक्षा हे अंतर चौपट आहे. 110 फूट रुंद असलेल्यालघुग्रहाचा वेग ताशी 104761 किलोमीटर इतका होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार,हा लघुग्रह पृथ्वीसाठीघातक ठरू शकणाऱ्या’अपोलो’समूहातील होता.1862मध्ये अपोलोने त्याचा शोधलावला होता. त्यामुळे या लघुग्रहांच्या समूहाला’अपोलो’नाव देण्यात आलंआहे. हे लघुग्रह पृथ्वीच्या परिभ्रमण मार्गातून जातात,हे त्याचं वैशिष्ट्यआहे. त्यापैकी एक असलेला’2024 RN16’हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तरमोठा विनाश झाला असता.

 

नासानं म्हटलं आहे की,जर2024 RN16लघुग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला असता तर त्याचा जमिनीपासून29किलोमीटर उंचीवर स्फोट झाला असता. त्यातून16मेगाटन टीएनटी इतकी ऊर्जानिर्माण होऊन एक भयंकर शॉकवेव्ह आली असती. अशा घटना999वर्षांत एकदाचघडतात. सुदैवाने हा लघुग्रह पृथ्वीवर न आदळता जवळून निघून गेला.

 

नासाचंसेंटर फॉर निअर-अर्थ ऑब्जेक्ट्स स्टडी (CNEOS)या लघुग्रहावर सतत लक्षठेवून होतं. याशिवाय मायनर प्लॅनेट सेंटर आणि गोल्डस्टोन सोलर सिस्टीमरडारही या लघुग्रहाचं निरीक्षण करत होतं. जेणेकरून या लघुग्रहाचा मार्ग आणिवेग कळू शकेल.

 

सध्या पृथ्वीच्या आसपास अनेक लघुग्रह आले आहेत. समोरआलेल्या माहितीनुसार, ‘2024ऑन’नावाचा लघुग्रह ताशी40,233 किलोमीटरवेगाने पृथ्वीच्या जवळून जात आहे. नासाच्या म्हणण्यानुसार,हा लघुग्रह15सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून997,793किलोमीटर अंतरावर होता.17सप्टेंबररोजी तो पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचेल. याशिवाय, ‘अपोफिस99942’नावाचालघुग्रह ताशी18300मैलांच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचीमाहिती समोर आली आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *